कार ची रेंज किती आहे?
Ev बाबतीत विचारला जाणार आणि ध्यानात घेतल्या जाणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे रेंज किती आहे? रेंज म्हणजे एकदा कार ची बॅटरी फुल चार्ज केल्यावर किती लांब वर प्रवास करू शकते. ही सामान्य माणसाचे सर्वात मोठी चिंता असते, जे त्याला इलेक्ट्रिक कार घेण्यापासून परवृत्त करूू शकते.
आज बहुतांश इलेक्ट्रिक टू चाक्याची रेंज ही 100ते 150 घरात आहेे. तर एव, कारची रेंज सुद्धा आता 200 ते 450 किमी प्रति चार्ज एवढी वाढली आहे अर्थात हे प्रत्येक कारची बॅटरी क्षमतेवर अवलंबून आहे. तसेच त्या गाडीसोबत कुठलं चार्जर दिले जाते त्यावरूनही किती वेळ तुम्हाला कार पूर्ण चार्ज करून चालवायला लागतो ते ठरतं.
पेट्रोल-डिझेलची कार घ्यावी की इलेक्ट्रिक कार ?
इलेक्ट्रिक कार खरेदी करायला सुरुवातीला अतिरिक्त 30 ते 50 टक्के लागत असले तरीही त्यानंतर ती कार चालवायला येणार खर्च तुलनेने कमी असतो.
तुमच्या घरच्या इलेक्ट्रिक बिल्लात थोडा बदल असू शकतो. पण सध्याचे इंधनाचे दर पहात तुमच्या एकूण कार चालवण्याच्या खर्चात फार मोठा फरक पडू शकतो.
अर्थात हे सगळं पहिल्या मुद्द्यातल्या प्रश्नावर अवलंबून आहे. तुमची कार दररोज किंवा आठवड्याला किती किमी चालवली जाणार आहे? आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वेगवेगळ्या राज्य सरकारकडून EV खरेदीला चालना देण्यासाठी अनुदान केव्हा सबसिडी सुद्धा दिली जाते. तसेच कार जुनी झाल्यावर ती विकायची असल्यास तिथेच वेगवेगळ्या ने अनुदान दिला जातो. याची माहिती तुम्ही प्रत्यक्ष कार खरेदी करताना त्या त्या मॉडेलनुसार डीलर कडूनही मिळू शकता |धन्यवाद|