5G Launch in INDIA: मित्रांनो आजपासून संपूर्ण भारत देशामध्ये इंटरनेटचे स्पीड अतिशय मोठ्या प्रमाणावर ती वाढणार आहे, तर हे नक्की का वाढणार आहे, काय प्रक्रिया आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो हा लेख जो आहे तो आपण संपूर्ण वाचा.
5G Launch in INDIA:
देशातील इंटरनेट वापर करताना कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त नेटवर्क कशा पद्धतीने वापरता येईल किंवा कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ब्राउझिंग आणि डाऊनलोडिंग कशाप्रकारे करता येईल यासाठी भारत सरकारच्या वतीने 5g लॉन्च करण्यात आलेला आहे. 5 gG उद्घाटन आज भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. त्यामुळे आत्ता जे आपण इंटरनेट वापरत आहात याला जवळजवळ दहा पट वेग वाढलेला आहे. त्यामुळे संपूर्ण भारत देशामध्ये एक चांगली बाब आहे.
Narendra ji Modi Launched 5G services in India:
पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते आज भय्यूजी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.दिल्लीमधील प्रगती मैदानावरती या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलेलं होतं. देशभरामधून जवळपास 13 शहरांमध्ये हे फाईव जी लॉन्च करण्यात आलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांच्या ओडिशा मधील गावामध्ये देखील आयोजित लाईव्ह चाचणी करण्यात आलेली आहे आणि ती चाचणी अतिशय यशस्वीपणे पार पडले असून याच्यामध्ये अफाट इंटरनेट स्पीड 5g च्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत आहे.
5G चे फायदे:
भारत देशामधील इंटरनेट वापर करताना कमी वेळात व कमी दरात दहा पट वेगाने नेटवर्क वापरता येणार आहे. सामान्य नागरिकांच्या मनात अजूनही फाईव्ह जी वापरा संदर्भात काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण आता दूर करणे आवश्यक आहे ,कारण की फाईव्ह जी च्या माध्यमातून अगदी काही सेकंदामध्ये आपल्या मोबाईल वरती जर मूव्ही डाऊनलोड करायचा असेल तर आपण काही सेकंदांमध्ये याचा जो पिक्चर आहे तो आपण डाउनलोड करू शकता त्यामुळे आपल्या वेळेमध्ये नक्कीच याची बचत होणार आहे.
कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर:
आजच्या या कार्यक्रमासाठी भारत देशातील प्रमुख पाहुणे हे प्रत्येक राज्यातील पदाधिकारी पदाधिकारी उपस्थित होते, त्याचबरोबर आजच्या उद्घाटन कार्यक्रमात स्वतः मुकेश अंबानी व आकाश अंबानी यांनी मोदींना फाईव्ह G संदर्भात माहिती देऊन प्रत्यक्ष अनुभव घडून दिला व 5g चे महत्व संपूर्ण देशाला पटवून दिले.
5G सुरू केलेली शहरे:
भारत सरकार दूरसंचार विभागाच्या माहितीनुसार भारतात 5g हे लॉन्च केल्याच्या नंतर सर्वप्रथम ट्रायल बेसिस वरती तेरा शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे .ज्यामध्ये मुंबई, दिल्ली,पुण, लखनऊ ,चेन्नई,कोलकत्ता, जामनगर ,हैदराबाद ,गुरुग्राम ,गांधीनगर, चंदीगड,बेंगलोरी ,अहमदाबाद ,नवी मुंबई यासारखी शहर यामध्ये समाविष्ट असून महाराष्ट्र मधील पुणे व मुंबई या दोन शहरांमध्ये फाईव्ह जी लॉन्स केल्याच्या नंतर अगदी खेड्यामध्ये देखील फाईव्ह जी नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी दूर संचार विभागात विभागाने तयारी दर्शवली आहे व लवकरच 5g हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल अशा प्रकारची माहिती दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे
आपल्या मोबाईल मध्ये 5g इंटरनेट चालवण्यासाठी काय करावे:
मित्रांनो आपल्याला जर फाईव्ह जी इंटरनेट सेवेचा जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याकडे जो मोबाईल फोन उपलब्ध आहे तो आपला 5g असणे आवश्यक आहे .जर फाईव्ह जी असेल तरच आपण याचा लाभ घेऊ शकतात .
जर मोबाईल आपला 5g नसेल आणि जरी आपण फाईव्ह जी नेटवर्क मध्ये जरी गेलात तरी देखील याचा आपण वापर करू शकणार नाही ,त्यासाठी आवश्यक आहे आपला 5g मोबाईल असने.
आपल्या मोबाईल मधील सिम कार्ड देखील आपल्याला फाईव्ह जी असणे आवश्यक आहे या दोन्ही गोष्टी मॅच झाल्याच्या नंतर आपण फाईव्ह जी नेटवर्कचा अतिशय चांगल्या प्रकारे लाभ घेऊ शकता आणि याचे स्पीड अप्रतिम आणि अनलिमिटेड फीड असणार आहे. त्यामुळे आपण या 5g सेवेचा लाभ घेऊन आपण आनंद घेऊ शकता.
तुमचा मोबाईल 5g आहे का चेक करा.
सर्वप्रथम आपल्याला सेटिंग मध्ये जावं लागेल त्यानंतर अँड्रॉइड मध्ये सेटिंग्स- त्यानंतर नेटवर्क आणि इंटरनेट यावरती क्लिक करायचा आहे. नंतर मोबाईल नेटवर्क यावरती क्लिक करायचा आहे .मोबाईल नेटवर्क वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर 5g 4g 3g अशाप्रकारे ऑप्शन येईल.
जर मोबाईल मध्ये पाहिजे अशा प्रकारे ऑप्शन आला व 5g पर्याय आला तर आपण समजून जायचं की आपला मोबाईल फाईव्ह जी आहे.
अर्थव्यवस्थाला फायदा होणार का:
अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 च्या दरम्यान दरम्यान 455 अब्ज डॉलर चा फायदा होण्याचा अंदाज तंद्यांनी वर्तवलेला आहे. 2030 पर्यंत भारतातील एकूण इंटरनेट वापरत करता पैकी एक तृतीयांश वाटा पाहिजे असेल त्यामुळे उत्पादन क्षेत्रात किरकोळ 12% आणि कृषी क्षेत्रात 11% यांना 5जी तंत्रज्ञानाचा फायदा होईल ,अशा प्रकारे अंदाज व्यक्त केला जात आहे.
त्यामुळे नक्कीच मित्रांनो 5g नेटवर्कचा संपूर्ण भारत देश शेतकरी वर्ग किंवा इतर कोणत्याही वर्गामध्ये याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा हा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. त्यामुळे नक्कीच भारत देशाचं हे पाऊल प्रगतीच्या दृष्टीने असणार आहे