Aaple sarkar Income certificate process

तहसीलदार यांच्याकडील उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अर्जदाराला महा ई सेवा केंद्र किंवा सेतूमध्ये जाऊन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच तलाठी यांच्याकडे उत्पन्नाचा अहवाल लागतो. हा अर्ज आपण मोबाईल वरून सुद्धा भरू शकतो. आपले सरकार महाऑनलाईन https://aaplesarkar.mahaonline.gov.in/  हे पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान कार्ड
  • तलाठी उत्पन्न दाखला
  • दोन फोटो रेशन कार्ड
  • सातबारा
  • आठ अ उतारा
  • रहिवासी घोषणापत्र इत्यादी

उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा

1. तुम्हाला दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल वरती खालील वेबसाईट उघडायचे आहे.

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

2. त्यानंतर तुम्हाला लॉगिन करण्याची पर्याय दिसेल त्यावर  नवीन यूजर येथे नोंदणी करा.

3. नोंदणी करण्यासाठी आपल्याला जिल्हा व मोबाईल नंबर टाकून ओटीपी पाठवा या बटन वरती क्लिक करायचे आहे.

4. व त्यानंतर त्याखाली लगेच पासवर्ड टाकण्यासाठी पर्याय येईल त्यामध्ये लक्षात राहील असा पासवर्ड टाकून घ्या.

5. व लगेच पुढे आपल्याला जन्मतारीख टाकण्यासाठी सांगितले जाईल व त्यानंतर नोंदणी करा या बटणावर क्लिक करायचे आहे.

आपले नोंदणी यशस्वी होईल. त्यानंतर आपण पुन्हा होम पेज सुरू करायचे आहे व नोंदणी करतेवेळी टाकलेली युजरनेम आणि पासवर्ड टाकायचे, तसेच जिल्हा निवडून लॉगिन करा.

उत्पन्नाचा दाखला अर्ज कसा भरावा ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Scroll to Top
Scroll to Top