खरीप पिक कर्ज
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने चालू वर्षाच्या खरीप हंगामासाठी एकाच महिन्यात 1 हजार 300 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. जिल्ह्यातील कर्ज वाटपाचे हे प्रमाण एकूण उद्दिष्टांच्या 68% इतकं पूर्ण झालेले आहे आत्तापर्यंत जिल्ह्यात 1 लाख 42 हजार 277 शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ देण्यात आलेला आहे. या दरम्यान खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना येत्या सप्टेंबर पर्यंत पीक कर्ज घेता येणार आहे.
खरीप हंगामासाठी एक एप्रिल 2023 पासून पीक कर्ज वाटप सुरू केल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय दिगंबर दुर्गाडे यांनी माहिती दिली. पुणे जिल्ह्याच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजदराने वितरित केले जात आहे. त्यानंतर सातारा जिल्हा बँकेने ही पुणे जिल्हा बँकेप्रमाणेच हा उपक्रम हाती घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मागील त्याला कर्ज हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आहे व आपण देखील कोणत्याही जिल्हा बँकेमधून कर्ज काढून आपल्याला देखील या योजनेचा फायदा होणार आहे.