anganwadi jobs:महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभाग यांच्यामार्फत अंगणवाडी सेविका व मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन देण्यासंदर्भात एक शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये कोणती माहिती आहे याबद्दलची आपण माहिती पाहूया.
Anganwadi sevika new update: आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन देणे शक्य व्हावे यासाठी अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दोन जून 2017 रोजी बैठकीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पात रक्कम अपेक्षित केली. के.सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्याचे विभागास अनुमोदय देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.anganwadi job
या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविका मदतीस व मिनी अंगणवाडी सेविका यांचे माहे ऑक्टोबर 2022 महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी विवरणपत्र सादर करण्यात आलेला आहे.
यामध्ये एकूण 13323 लाख एवढा निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे
शासन निर्णय पहा
अंगणवाडी सेविका यांचे यापुढे होणार वेळेवर मानधन
अंगणवाडी सेविकांचे मानधन आहे ते लवकरात लवकर शासनाकडून दिले जाणार आहे आणि भविष्यामध्ये देखील यांचं मानधन हे लवकरात लवकर होण्यासंदर्भातची प्रक्रिया देखील शासनाकडून करण्यात आलेली आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांचे मानधन आहे ते लवकरात लवकर आणि वेळेवर ती होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांमधून एक आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे.
सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 189/1472 दिनांक 13/09/2022 व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 225 दिनांक 26/09/2022 नावे दिलेल्या माहितीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईट वरती आपण पाहू शकता त्याचा सं/क्रमांक 20 22 10 28 12 32 59 83 30 असा आहे.
9922209183