साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मिळणार १ लाख कर्ज : Annabhau Sathe Karj Yojana

Annabhau Sathe Karj Yojana: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेच्या कार्याची मर्यादा 25 हजार रुपयावरून एक लाख रुपये पर्यंत वाढवण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत यापूर्वी कर्ज देण्याची मर्यादा 25 हजार रुपयापर्यंत होती परंतु ही मर्यादा वाढवून आता आपल्याला एक लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे. तर हे कर्ज आपल्याला जर हव असेल तर त्यासाठी काय प्रोसेस करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो हा लेख सुरू करूया.Annabhau Sathe Karj Yojana

Lokshahir Annabhau Sathe Karj Yojana maharashtra:

महाराष्ट्र राज्यातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग आणि तत्सम समाजातील जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होण्यासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना कंपनी कायदा अधिनियम १९५६ (१) च्या तरतुदीनुसार सामाजिक न्याय विभागाअंतर्गत दिनांक ११ जुलै १९८५ रोजी केली आहे. मातंग समाजासाठी लेखणीद्वारे खऱ्या अर्थाने सामाजिक प्रगतीची प्रेरणा निर्माण करणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे या वंदनीय विभूतीच्या नावाने स्थापन झालेल्या या महामंडळाद्वारे

मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या पुढील १२ पोट – जातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते. (१) मांग (२) मातंग (३) मिनी-मादींग (४) मादींग (५) दानखणी मांग (६) मांग महाशी (७) मदारी (८) राधे मांग (९) मांग गारुडी (१०) मांग गारुडी व शासन निर्णय संकीर्ण – २०१२/क्र. ३१ महामंडळे दिनांक २२ मे २०१२ नुसार (११) मादगी (१२) मादिगा ह्या दोन पोट जाती समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.Annabhau Sathe Karj Yojana

आवश्यक कागदपत्रे:

१)उतप्न अहवाल

2.कास्ट सर्टिफिकेट
3. पासपोर्ट आकाराचा 2 फोटो
4. रेशन कार्ड
5. शैक्षणिक दाखला.
6. आधार कार्ड
7. मोबाईल नंबर

८)इमेल आय डी
9. ड्रायव्हिंग लायसन्स
10. अनुभव दाखला
11.  प्रतिज्ञापत्र

कर्ज सहभाग व कर्ज फेड:

  • प्रकल्प मूल्य –  एक लाख रुपये.
  • महामंडळाचा सहभाग – 85 हजार रुपये
  • अनुदान – दहा हजार रुपये
  • अर्जदाराचा सहभाग – पाच हजार रुपये
  • व्याजदर-  चार टक्के
  • परतफेड करण्याचा कालावधी – तीन वर्ष

Annabhau Sathe Karj Yojana; LASDC Schemes

Lokshahir Anna Bhau Sathe Dev.Co.Ltd

LASDC Loan schemes

Lokshahir Anna Bhau Sathe karj yojana

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top