माजी सरपंच कै. बबन लक्ष्मण मराठे यांच्या स्मरणार्थ कुळे गावात विविध शिबिरांचे आयोजन: Arogya shibir

Arogya shibir:मुळशी

माजी सरपंच कै बबन लक्ष्मण मराठे यांच्या स्मरणार्थ कुळे गावात विविध शिबिरांचे आयोजन

मुळशी:
मुळशी तालुक्यामधे डोंगररांगामधे वसलेल्या कुळे या छोट्याश्या गावामधे कै बबन लक्ष्मण मराठे यांच्या स्मरणार्थ  युवा उद्योजक तसेच नावाजलेले सामाजिक कार्यकर्ते अरुण मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त कुळे,चाले , दखने  , नानेगाव , चिखलगाव चिखलगाव या
पाच गावच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते . याप्रसंगी माजी सभापती श्री बाबा कंधारे , सरपंच श्रीमती मंदाबाई बबन मराठे व सर्व ग्रा पं सदस्य तसेच सर्व गावचे ग्रामस्थ माता भगिनी मोठ्या संखेने उपस्थित होते , मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे पूजन करुन शिबिराला सुरवात करण्यात आली .

युवा उद्योजक अरुण मराठे यांनी त्यांचे वडील कै बबन लक्ष्मण मराठे यांच्या स्मरणार्थ घेतलेल्या शिबिरामधे देवयानी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ,यांचे मार्फत आरोग्य शिबीर,तसेच शेतकऱ्यांपर्यंत महाराष्ट्रातील घराघरात शेतकरी योजना पोचवनारे डिजीटल अभिजीत , यांच्या मार्फत सेवा देण्यात आली.

मोफत नेत्रतापासनिसाठी प्रसिद्ध असणारे लाईफ व्हिजन मेडिकल फाउंडेशन तसेच विविध शासकीय योजनांवर काम करणारे हवेली , वेल्हेचे पत्रकार समीर कांबळे यांनी भाग घेतला होता . यामधे पाचही गावामधुन बहुसंख्य नागिरकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि युवा उद्योजक अरुण मराठे याना आशीर्वादरूपी शुभेछ्या दिल्या .
पाच गावनामधुन आलेल्या नागरिकांची मोफत नेत्र तपासणी अल्प दरात चश्मे ,रूधयरोग तपासणी , हिमोग्लोबिन तपासणी , मणक्याचे आजार तपासणी , जनरल चेकप तसेच इतर तपासण्या मोफत करण्यात आल्या,त्याच बरोबर त्याना अत्यावश्यक असणाऱ्या शासकीय योजनाची माहिती आणि  आभा कार्ड , आयुषमान भारत कार्ड , रेशनिग कार्ड , संजय गांधी निराधार योजना , श्रावनबाळ योजना,ट्रकटर योजना,नांगर,रोटर,कांदा वखार,ठिबक योजना,सौर पंप योजना आदी योजना आशा विविध उपक्रमांचा बहुसंख्य नागरिकानी लाभ घेऊन युवा उद्योजक अरुण मराठे यांचे गोड शब्दात कौतुक केले .

अशा योजनां राबविल्यामुळे जनतेमधून समाधान व आनंद व्यक्त होत आहे.

अधिक अशाच  मातीहीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top