CM KISAN YOJANA MAHARASHTRA :
शेतकरी बंधूंनो राज्य सरकारने कृषी विभागाकडून माहिती संकलित केली आहे. एकाच 7/12 व त्यावर कुटुंबप्रमुख , आणि त्यांची पत्नी व याचबरोबर 18 वर्षाखाली दोन अपत्य असे, कुटुंब ग्राह्य धरून प्रत्येक कुटुंबास दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून दिले जाणार आहेत. आणी वर्षातून 3 वेळा प्रत्येक 2 हजार रुपये प्रमाणे देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अंतर्गत दिले जाणार आहेत. व याचबरोबर या योजनेचे निकष मुख्यमंत्री नमो शेतकरी महा सन्मान योजना निधी अंतर्गत लागू करण्यात आले आहे.
या योजनेसाठी क्षेत्राचे कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. पण जमीन लागवड योग्य असणे आवश्यक आहे, व हे सर्वांसाठी बंधनकारक ठेवण्यात आले आहे.
KYC COMPULSORY :
याबरोबर ज्या शेतकऱ्यांची शेतजमीन 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीची आहेे; त्यांनी इ-केवायसी व बँक खात्याला आधार लिंक केलेले असावेत. ज्यांनी कोणी नावावर मालमत्तेची माहिती महसूल विभागात दिलेली नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असे देखील आहे.
अर्थात ज्या शेतकऱ्यांनी ही ई- केवायसी किंवा बँक ला आधार कार्ड लिंक केलेला नाही, असे शेतकऱ्यांना निधी मिळणार नाही. केवायसी आणि बँक खात्याला आधार लिंक करून घेणे गरजेचे आहे. केवायसी आणि आधार लिंक करण्यासाठी शेतकऱ्यांना ठराविक दिवसांची मुद्दत देण्यात येणार आहे.