Dhan Bonus Maharashtra 2023:महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे.अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री शिंदे व त्यांच्या सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय आणि महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे, यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस अनुदान देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. कोणता शेतकरी यामध्ये पात्र होणार आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे ही योजना नक्की काय आहे याबद्दलची माहिती आपल्याला मिळणार आहे.Dhan Bonus Yojana 2023
Dhan Bonus Yojana 2023:
पाच लाख शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 15000 रुपये मिळणार धन बोनस योजना महाराष्ट्र 2023 चा लाभ दिला जाणार आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे अधिवेशनामध्ये पिक विमा पेन्शन योजना, अतिवृष्टी ,बाजार भाव, या सर्व गोष्टी वरती चर्चा होऊन त्यावरती उपाययोजना करण्यासंदर्भात वेगवेगळे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तर यामध्ये सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादना करता प्रती हेक्टरी 15000 रुपये याप्रमाणे दोन हेक्टर पर्यंत पंधरा हजार बोनस अनुदान देण्यात येणार आहे. अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
Maharashtra Latest News
त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. बोनस रक्कम ऑनलाइन पद्धतीने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा जमा केली जाणार आहे. केंद्र शासनाने राज्यातला 15 लाख मॅट्रिक टन धान खरेदी मंजुरी दिली आहे अशा प्रकारचे देखील माहिती मंत्रिमंडळातून देण्यात आलेले आहेत.
कोणाला लाभ मिळणार:
अतिवृष्टीमुळे ज्या धन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना हेक्टरी 15000 रुपये बोनस देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात जमा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना हेक्टरी 15000 देण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन हेक्टर पर्यंतचे शेतकऱ्यांना हा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.