e krishi yantra:महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सदर योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.यामध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.
उदा. नांगर रोटर व स्वयंचलित औजारे रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)अशा असंख्य मनुष्यचलीत व बैलचलीत औजारे यामध्ये आपल्याला मिळणार आहेत.शेतकरी बंधुनो हा फॉर्म आपणा जर भरला तर आपण यामध्ये १००% पात्र होऊ शकता.त्यासाठी हा फॉर्म जास्तीत जास्त शेतकरी वर्ग यांनी भरावा यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत.
e krishi yantra:
सदर योजना हि MAHADBT अंतर्गत असून शासनाकडून राबविण्यात येत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी आधार क्रमाांक आवश्यक आहे परंतु आपल्याकडे आधार कार्ड काढल्याची पावती असल्यास आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.
आवश्यक कागदपत्रे:
- .आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा व आठ अ उतारा
- मोबाईल क्रमांक
- इमेल
अनुदान किती मिळेल?
या योजनेत आपण जर पात्र झालात तर यासाठी सरासरी४० ते ५० % पर्यंत अनुदान आहे.
म्हणजेच सरासरी ४० ते ४५ हजार पर्यंत अनुदान मिळेल
टीप:एकदा फॉर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे यामध्ये आपण एकदा फॉर्म भरला तर १००% पात्र होऊ शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा