गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना पुन्हा सुरु: galmukt dharan Galmukt shivar yojana maharashtra

galmukt dharan Galmukt shivar yojana maharashtra: मित्रांनो गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना राज्य शासनाच्या वतीने पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेले आहे याबाबतचा शासन निर्णय 16 जानेवारी 2023 रोजी महाराष्ट्र शासनाचा मृत व जलसंधारण विभाग यांच्यामार्फत सादर करण्यात आलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे व गाळयुक्त शिवार नक्की काय आहे याबद्दल माहिती पाहूया

galmukt dharan Galmukt shivar yojana maharashtra:

ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन निर्णय दिनांक 6 मे 2017 नवे गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार योजना राबवण्यात आले होते सदर योजनेची मुदत मार्च 2021अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना पुन्हा त्या स्वरूपात राबवल्या बाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचारात होता व त्या दृष्टीने हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे.

galmukt dharan Galmukt shivar yojana maharashtra:

मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या जलसाठ्यातील गाळ काढणे व शेतात वापरणे या कामी गाळमुक्त धरण व गाळमुक्त शिवार ही योजना पुढील तीन वर्षाकरिता राबवण्यात येणार आहे याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे आपण ज्या परिसरामध्ये राहता त्या परिसरामध्ये जर जलयुक्त शिवार असेल तर यामध्ये जर जास्त गाळ झाला असेल तर प्रशासनाकडून तो गाळ काढून शेतजमिनी मध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळे ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी फायद्याची योजना असून आपल्या परिसरातील जलाशयामधील गाळ या मार्फत काढला जाणार आहे व आपल्या शेतीमध्ये हा टाकला जाणार आहे त्यामुळे आपला जलसाठा वाढून आपल्या शेतजमीचा विकास होणार आहे त्याचबरोबर आपल्याला माती देखील मिळणार आहे तर अशा प्रकारे ही योजना पुन्हा पुढील तीन वर्षासाठी सुरू करण्यात आलेले आहे

याबाबत शासन निर्णय पहा

 

अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top