Gautam buddha story in english: लाशिरगावमधे बौद्ध पौर्णिमा उत्साहात,सर्व गावानी आदर्श घ्यावा अशी बौद्ध पौर्णिमा

 Gautam buddha story in english

*लाशिरगावमधे बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी*

    लाशिरगावमध्ये ५ में २०२३ रोजी दरवर्षीप्रमाणे तालुक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व गावानी आदर्श घ्यावा अशी बौद्ध पौर्णिमा धम्मदीप संघ लाशिरगाव व भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा लाशिरगाव यांच्यावतीने साजरी करण्यात आली . याप्रसंगी भा बौ महासभा पुणे जिल्हा अध्यक्ष अरुण सोनवणे , भा बौ महासभा सरचिटणीस राजरतन थोरात , पुणे जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष अनिल सोनवणे , भा बौ महासभा पुणे जि उपाध्यक्ष वामन वाघमारे , भा बौ महासभा वेल्हे तालुका अध्यक्ष अशोक जगताप, वेल्हे खादी ग्रामोद्योग चेअरमन नथू गायकवाड़ , आर पी आय वेल्हे तालुका अध्यक्ष कुंदन गंगावने ,आझाद समाज पार्टी पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गायकवाड़ , विश्वा फाउंडेशन सचिव संजय गायकवाड , सरपंच नितिन आधवड़े , पो पाटिल गोपाळ कातुर्दे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते .Gautam buddha story in english

*लाशिरगावमधे बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी*

        दरवर्षी प्रमाणे साध्या पद्धतित परंतु सर्वाना आदर्श अशी वेल्हे तालुक्यामधे बौद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. बौद्ध पौर्णिमेसाठी लाशिरगाव येथील भीमनगर मधील सर्व अनुयायानी पांढरे वस्त्र परिधान करुण सर्व आदर्श समाजसुधारकांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करुण सकाळी बौद्ध पूजा केली . तसेच ४ वा ३० मी मिरवणूक बौद्ध पद्धतित शांततेत पार पडली . मिरवणुकीमध्ये सर्व महापुरुषांच्या नावाने घोषणा देऊन संपूर्ण गावामध्ये कोणत्याही प्रकारचे नाचगाने न करता मिरवणूक काढण्यात आली . आशा पद्धतिची मिरवणूक वेल्हे तालुक्यातील कोणत्याही गावामाध्ये आजच्या इतिहासात झालेली नाही . अशी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . मिरवणुकी नंतर जाहिर सभा घेण्यात आली आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे पुस्तक आणि गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आले . तसेच सभेमध्ये उपस्थित मान्यवरानी प्रबोधनपर प्रवचन देऊन लाशिरगावमधील सर्व बौद्ध अनुयायांचे कौतुक केले .Gautam buddha story in english

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top