Gram panchayat work details: सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये काय असतात

gram panchayat work details: आजच्या या लेखामध्ये आपण सरपंच यांची कार्य व जबाबदारी काय असते याबद्दल माहिती पाहणार आहोत.भारताचा ग्रामीण गावे हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे, याच गावांचा विकास करण्याची जबाबदारी असते ती म्हणजे सरपंचावर आजच्या लेखात आपण बघणार आहोत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम ३८ नुसार सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये यांची सविस्तर माहिती (

सरपंच जबाबदार्‍या व कर्तव्ये

ग्रामपंचायतीच्या सभा बोलावणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे. ग्रामसभा बोलविणे व त्याचे अध्यक्षपद भूषविणे. सभेमध्ये पारीत केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीचे अभिलेख सुरक्षित ठेवण्यासाठी नियंत्रण करणे.

ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्ता सुरक्षित असल्याबाबत ची खात्री करणे. जमाखर्चाचे विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करणेची व्यवस्था करणे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम ४९ नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामविकास समित्यांचे पदसिध्द अध्यक्षपद भूषविणे.

ग्रामपंचायतीकडे कर जमा करणे. आलेल्या रकमा व त्यातून काढण्यात आलेले धनादेश यांस सरपंचग्रामसेवक संयुक्त जबाबदार राहतील. ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व ते मासिक सभा आणि ग्राम सभेपुढे मान्यतेसाठी सादर करणे. सूक्ष्म नियोजना द्वारे गावाचा विकास आराखडा तयार करणे.

ग्रामसभा व ग्रामपंचायतीच्या मदतीने सर्व योजनांची अंमलबजावणी करणे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे. गाव पातळीवरील विविध संस्थांशी समन्वय साधून कामांचे नियोजन करणे.

सरपंचाची कर्तव्ये

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.                   व्हॉटसप ग्रुप  आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.                Telegram Group  सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.                  Youtube Channel  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top