तुम्ही मतदार ओळखपत्र आधार कार्डशी कसे लिंक करू शकता सविस्तर माहिती:
तुम्ही मतदार ओळखपत्र आधार कार्डशी कसे लिंक करू शकता ते पहा
भारत निवडणूक आयोग 1 ऑगस्टपासून संपूर्ण भारतासह महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.
भारत निवडणूक आयोग 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक करण्याची मोहीम सुरू करणार आहे, असे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. मतदार ओळखपत्रांशी आधार कार्ड लिंक करण्याचा उपक्रम, मतदारांची ओळख प्रस्थापित करणे आणि मतदार यादीतील नोंदी प्रमाणित करणे आणि समान किंवा भिन्न मतदारसंघातील डुप्लिकेट नोंदी दूर करणे या उद्देशाने सुरू करण्यात आला आहे.मतदारांसाठी आधार-मतदार ओळखपत्र लिंकिंग प्रक्रिया अधिक सुरळीत करण्यासाठी आयोग संपूर्ण महाराष्ट्रात शिबिरे उभारणार आहे.याचा मुख्य उद्देश हाच आहे कि ज्या ठिकाणी दुबार मतदान होते,त्यावर आता आळा बसणार आहे.त्यामुळे बाविश्यामध्ये त्याचा आयोगाला फायदा होणार आहे.
राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टल (NVSP) द्वारे आधार कार्ड आणि मतदार कार्ड कसे लिंक करावे?
- NSVP पोर्टलवर लॉग इन करा आणि मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या मतदार यादीमध्ये शोधा पर्यायावर क्लिक करा.
- वैयक्तिक तपशील वापरून किंवा तुमचा EPIC क्रमांक आणि राज्य सबमिट करून तुमचे मतदार कार्ड शोधा
- तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला “Feed Aadhaar No.” दिसेल, त्यावर क्लिक करा
- तुमचा EPIC म्हणजेच मतदान कार्ड क्रमांकासह तुमचा आधार तपशील विचारणारी एक पॉप विंडो दिसेलआवश्यक तपशील सबमिट करा आणि तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर किंवा ईमेल पत्त्यावर प्राप्त झालेला OTP वापरून तुमची ओळख प्रमाणित करा.
- सबमिट वर क्लिक करा.
- आधार आणि EPIC च्या यशस्वी लिंकची माहिती देणारी सूचना तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
अशाप्रकारे आपले आधार कार्ड आपण मतदान कार्डशी लिंक करू शकता परंतु हे आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया शासनाने सक्तीची केलेली नाही. म्हणजे हे ऐच्छिक आहे. म्हणजे एखाद्याने जर आधार कार्ड व मतदान कार्ड लिंक केले नसेल तर त्याला मतदान करता येणार नाही किंवा त्याला मतदान यादीतून वगळता येईल अशा कोणत्याही प्रकारची तरतूद नाही. म्हणजे ही सर्व प्रक्रिया ऐच्छिक आहे.भविष्यामध्ये ही सर्व प्रक्रिया सक्तीची केली जाऊ शकते.जर एखाद्या व्यक्तीने आधार कार्ड आणि मतदान कार्ड लिंक केलं नसेल तर त्याला मतदार यादीतून वगळ, जाणार नाही. अशा प्रकारची माहिती निवडणूक आयोगाचे सन्माननीय श्री श्रीकांतजी देशपांडे यांनी सांगितले.
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
या योजना देखील बघा :
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,शिंदे व फडणवीस सरकारचा मोठा निर्णय…
- पुणे महानगरपालिकेत 448 जागांसाठी भरती-Pune Municipal Corporation Recruitment 2022