Jamin Kharedi Anudan Yojana – जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून मिळणार आता अनुदान,आजच अर्ज करा

Jamin Kharedi Anudan Yojana

Jamin Kharedi Anudan Yojana:मित्रांनो आपल्याला जर जमीन खरेदी करायची असेल तर शासनाकडून यासाठी आपल्याला जमीन खरेदी करण्यासाठी अनुदान मिळणार आहे, तर ह्या योजनेसाठी आपल्याला कशा पद्धतीने लाभ घ्यायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे आपल्याला जमीन खरेदी करायची असेल तर आपल्याला देखील याच्यामध्ये अनुदान मिळणार आहे तर ही योजना काय आहे याबद्दलची माहिती आपण पाहूया.

Jamin Kharedi Anudan Yojana:

जमीन खरेदी अनुदान योजना हि दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अशी असून हि योजना सन 2004 पासून राज्यांमध्ये कार्यान्वित करण्यात आलेली आहे.ही योजना राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली योजना असून या योजनेचे नाव दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना असा आहे.

Jamin Kharedi Anudan Yojana:

या योजनेच्या अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेत मजूर कुटुंबांना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत चार एकर कोरड वाहू आणि दोन एकर ओलिताखाली जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर अशा योजनेसाठी आपल्याला कशा पद्धतीने लाभ घ्यायचा हे आपण पाहूया

 या योजनेमध्ये कोण पात्र होऊ शकतो:

आपण जर अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर असाल तर या योजनेअंतर्गत आपल्याला जमीन खरेदी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 50% रक्कम ही बिन व्याजी  कर्जामध्ये व 50 टक्के रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत आपल्याला जमीन शासनाकडून मिळणार आहे जमीन खरेदी तसेच लाभार्थी निवड करण्याची संपूर्ण अधिकार हे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे.

म्हणजेच या योजनेमध्ये फक्त अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील भूमिहीन शेतकरी  सहभागी होऊ शकतील

जमीन खरेदी अर्ज डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय मार्च २०१२ पहा

 

शासन निर्णय सन २०१८ पहा

 

याची निवड प्रक्रिया कशी असणार आहे?

आपण जर अनुसूचित जाती व नोबुद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमीहीन शेतमजूर असाल तर आपल्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करायचा आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती घटीत करण्यात येणार आहे यामध्ये तालुकास्तरीय महसूल अधिकारी यांची देखील उपसमिती घटित करण्यात येईल. यामध्ये जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे समिती सदस्य यामध्ये असणार आहेत.

या योजनेअंतर्गत जमिनीसाठी विविध अडचणीमुळे जमीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. म्हणजेच अर्ज केल्याच्या नंतर यामध्ये जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडे आपला प्रस्ताव सादर केला जाईल आणि त्या प्रस्तावाच्या मागणीनुसार आपल्याला भविष्यामध्ये जमीन खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळू शकतो त्यासाठी आपल्याला असा अर्ज करणे आवश्यक आहे.

योजना कोणी व कोणत्या विभागामार्फत सुरू केली आहे:

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही राज्य सरकारकडून सामाजिक व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेली योजना असून याच्यामध्ये जमीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी स्वरूपामध्ये कर्ज मिळणार असून 50 टक्के रक्कम ही अनुदान स्वरूपामध्ये असणार आहे

जमीन खरेदी करण्यासाठी रक्कम किती मिळणार आहे:

शेतकरी बंधूंनो आपल्याला जमीन खरेदी करण्यासाठी रक्कम रेडी रेकनरच्या दरानुसार ठरवली जाणार आहे म्हणजे सरासरी आपल्याला यामध्ये जिरायती जमिनी करता प्रति एकर पाच लाख आणि बागायती जमिनी करता प्रति एकर आठ लाखापर्यंत रक्कम आपल्याला मिळू शकते

जमीन खरेदी करत असताना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रचलित रेडी रेखानाच्या किमती प्रमाणे जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करावा. जर रेडी रेकनर  च्या दराप्रमाणे जमीन उपलब्ध नसेल तर आपल्याला जमीन मालकाशी चर्चा व वाटाघाटी  करणे आवश्यक आहे.

जमीन खरेदी करण्यासाठी आवश्यक बाबी:

  • जमीन उपलब्ध करण्यासाठी संबंधित भागात मागील तीन वर्षाचे – पाच वर्षाचे खरेदी विक्री व्यवहार या गोष्टींचा विचार घेऊन जमीन खरेदी करण्यात यावी
  • जमीन खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 ते किमान किमान 60 इतके असावे
  • कुटुंब हे दारिद्र्यरेषेखालील असावे

जमीन विकण्यास इच्छुक शेतकऱ्यासाठी अर्ज

या योजनेमध्ये पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  • शेतजमीन पसंत बाबत लाभार्थ्यांचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र सादर करावे
  • मागील वर्षाचा आर्थिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला
  • मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • रहिवासी दाखला
  • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांचा दाखला
  • लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली असल्याबाबतचा दाखला
  • वय 60 वर्ष किंवा त्यापेक्षा कमी असल्याचा दाखला
  • अर्जदाराचे अनुसूचित जाती प्रवर्गात असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र
  • फोटो
  • आवश्यक वाटल्यास इतर कागदपत्रे

९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top