kanda anudan 2023 shasan nirnay:
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांना रुपये 350 प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त 200 क्विंटल प्रति शेतकऱ्यांना अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे
- जे शेतकरी थेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च २०२३ या कालावधीत संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती खाजगी बाजार समितीमध्ये अथवा नाफेड करून लेट खरीप कांदा खरेदी करिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना आहे
- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी ही योजना राबविण्यात यावी
- परराज्यातून अबक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू होणार नाही
- सदर अनुदान थेट बँक हस्तांतर डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा केले जाईल
- सदर अनुदान आयसीआयसीआय बँकेमार्फत अदा करण्यात येईल
- कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अनुदान मिळण्यासाठी खालील कागदपत्रे जोडावी
- शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचा प्रस्ताव हे संबंधित बाजार समितीने तयार करावेत
- प्रस्ताव तयार करण्याची संपूर्ण जबाबदारी बाजार समितीची राहील सदरचे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांनी तपासून ते जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी योग्य प्रस्तावना मंजुरी दिल्यानंतर ती यादी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना मान्यतेसाठी सादर करण्यात येईल त्यांनी तपासून अंतिम केलेल्या यादीस पणन विभागामार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यात येईल
- या संदर्भात जर आपल्याला काही मदत लागली तर आपण तालुका कृषी समिती यांच्याकडे संपर्क साधू शकता