Kandachal Anudan Yojana Maharashtra:नमस्कार शेतकरी बंधूनो महाराष्ट्र राज्य शासनाने कांदा वखार/कांदाचाळ अनुदान योजना २०२२ साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी निधी उपलब्ध केलेला आहे.आपणाला जर कांदा वखार बांधायची असेल तर यामध्ये आपल्याला खात्रीशीर लाभ मिळणार आहे.शेतकरी बंधुंनो हि स्टेप सविस्तर पहा व जर आपल्याला या योजनेचा लाभ घेयचा असेल तर १००% आपण यामध्ये लाभ घेऊ शकता.
Kandachal Anudan Yojana Maharashtra:
महाराष्ट्रामध्ये कांदा पिकाची लागवड जास्तीत जास्त अहमदनगर, नाशिक, पुणे ,सातारा ,कोल्हापूर, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यामध्ये केली जाते. कांदा पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादनात भारत देश हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात कांद्गयाची गरज भागून कांदा हा मोठ्या प्रमाणावर निर्यात केला जातो. भारतामध्ये सुमारे पाच लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या पिकाच आहे आणि जवळ जवळ 74 लाख मॅट्रिक टन उत्पादन आपल्याला त्यामधून मिळते. देशातील एकूण उत्पादनापेक्षा 26 टक्के कांदा हा महाराष्ट्र राज्यामध्ये घेतला जातो. जर आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या भारत देश दहा लाख टन जर आपण कांदा निर्यात करत असेल तर त्यामधील सात लाख टन कांदा हा महाराष्ट्रामध्ये घेतला जातो.
कांदा चाळ अनुदान लाभार्थी निवड:
याची लाभार्थी निवड कशी होते तर या योजनेत आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाडीबीटी या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करायचा आहे. त्यानंतर आपली निवड प्रक्रिया होते आणि मग आपल्याला या योजनेचा लाभ दिला जातो. यासाठी आपल्याकडे आधार कार्ड, बँकेचे पासबुक आणि सातबारा असणे आवश्यक आहे.सदर फॉर्म आपल्याला ऑनलाईन स्वरुपात भरायचा आहे.तो आपण महा इ सेवा केंद्र किंवा csc केंद्र यांचेमार्फत भरू शकता किंवा सदर फॉर्म हा घरी देखील भरू शकता.किंवा हा फॉर्म आपण घरी देखील भरू शकता.तो कसा भरायचा याबद्दल चा व्हिडीओ आपण खाली पाहू शकता.
कांदा चाळ अनुदान योजनेचे स्वरूप:
१) यामध्ये आपल्याला ५,१०,१५,२०,२५ टन पर्यंत क्षमतेच्या कांदा चाळीसाठी अनुदान मिळणार आहे.
२) कांदा चाळ बांधकाम हे आराखड्याप्रमाणे असणे आवश्यक आहे.
३) ७/१२ उताऱ्यावर कांदा नोंद असावी.
४) वैयक्तिक शेतकऱ्यास २५ टन पर्यंत कांदा वखार लाभ देण्याची तरतूद आहे.
कांदा चाळ अनुदान अर्थसहाय्य:
कांदाचाळ अनुदान अर्थसहाय्य पुढील स्लाब मध्ये आपण पाहू शकता.
कांदा चाळ आकारमान कसे असावे ?
संपूर्ण कांदाचाळ बांधकाम कसे करावे:
कांदा वखार कशी बांधावी सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी बंधुनो अशा प्रकारे आपण आपली कांदा चाळ बांधू शकता.
सदरील कांदाचाळ योजना ची आपल्याला जर PDF पाहू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती आपणास उपलब्द्ग आहे.
कांदाचाळ योजना PDF पहा
कांदाचाळ व्हिडीओ पहा
नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.