उत्पन्न दुप्पट करणारी कुसुम योजना आहे तरी काय?सविस्तर संपूर्ण माहिती: Kusum Yojana Online Registration Form

Kusum Yojana Online Registration Form:  मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 30 ऑक्टोबर 2022 रोजी मन की बात या कार्यक्रमांमध्ये देशाला मार्गदर्शन करताना त्यांनी शेती विषयी धोरणांबद्दल माहिती दिली व ते बोलताना पी एम कुसुम योजनेबद्दल देखील बोलले.

ही योजना सुरू करण्यामागचा हेतू म्हणजेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के रक्कम खर्च करून सौर पंप बसवता येणार आहे. यामधील 90% खर्च हे शासन करणार आहे. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांनी या कार्यक्रमांमध्ये दिलेली आहे तर ही योजना काय आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहूया.

Kusum Yojana Online Registration Form:

शेतकरी बंधूंना कुसुम सोलर योजना ही योजना केंद्र शासनाच्या मार्फत चालवली जाणारी योजना असून यामध्ये सौर कृषी पंपाद्वारे शेतकऱ्यांना फक्त दहा टक्के खर्चावर कृषी पंप बसवता येणार आहे. बाकी 90% रक्कम ही शासन स्वतः भरणार आहे म्हणजेच दोन लाख रुपये खर्च जर सौर कृषी पंपाला येत असेल तर आपल्याला फक्त 19 हजार रुपये एवढी रक्कम भरावी लागणार आहे. बाकी उर्वरित रक्कम ही केंद्र शासनाच्या मार्फत भरली जाणार आहे.

Kusum yojana 2022:

कुसुम योजना म्हणजेच कृषी ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महा अभियान असं याचं पूर्ण नाव आहे. देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर शेतकरी डिझेल इंजिन फक्त वापरतात त्यामुळे त्यांच्या उत्पन्नाचा एक भाग डिझेल खरेदी करण्यामध्ये जातो आणि हा खर्च थांबवण्यासाठी ही शासनाने योजना राबविण्याचा ध्यास हाती घेलता आहे.

कुसुम योजनेमुळे शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढणार आहे?

शेतकरी बंधू  या योजनेच्या माध्यमातून सरकारने खर्चात कपात करण्याबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे.याबाबत आज देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी देखील चर्चा केलेली आहे.

या योजनेनुसार शेतकरी सौर ऊर्जा प्रकल्प बसू शकतात आणि 90% खर्च सरकार उचलणार आहे म्हणजे यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा खर्च येणार नाही या पंपाच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतात सिंचन करून उत्पन्न मिळू शकतात यातून निर्माण होणारी वीजही शेतकरी वीज कंपनीला विकू शकणार आहेत.

या योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार?

या योजनेमध्ये अल्पभूधारक किंवा तीन एकर, पाच एकर पेक्षा जास्त शेती असणारे शेतकरी देखील यामध्ये पात्र होऊ शकतात यामध्ये तीन एचपी पाच एचपी व साडेसात एचपी अशा स्वरूपामध्ये सौर कृषी पंप वितरित करण्यात येणार आहेत.

याव्यतिरिक्त शेतकऱ्यांचे गट पीक उत्पादन संस्था, पंचायत एफपीओ, पंचायती ,सहकारी संस्था, पाणी वापर करणाऱ्या घटकांना त्यांच्या कक्षेत आणण्यात आलेले आहे. सर्वजण कुसुम योजनेसाठी अर्ज करू शकतात.

डिझेल पंपाचे रुपांतर होणार सौर कृषी पंपात:

या योजनेच्या मदतीने डिजेल वर चालणाऱ्या पंपाचे रूपांतर सौर उर्जेवरती चालणाऱ्या पंपामध्ये करण्यात येणार आहे.जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च वाचणार आहे. डिझेल साठी जो खर्च होत आहे तो यामधून वाचणार आहे आणि फक्त उन्हावरती हा सौर कृषी पंप चालणार आहे. त्यामुळे यामध्ये अतिशय कमी खर्च आणि जास्त फायदा असा या योजनेमधून होणार आहे.

अतिरिक्त वीज विकू शकता:

यामध्ये तयार होणारी अतिरिक्त वीज ही फार्मर्स सरप्लस वितरण कंपनीला DISCOM ला विकली जाईल त्यामुळे पुढील पंचवीस वर्षे शेतकऱ्यांची कमाई सुरु राहील त्यांची देखभाल करणे देखील सोप्प होईल यांच्या मदतीने शेतकऱ्यांना दरवर्षी एक लाख नफा मिळू शकतो.

अर्ज करण्यसाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना सूचना:अर्ज करत असताना कोणत्याही वेबसाईट वर अर्ज करू नये.अशा अनेक फसव्या वेबसाईट आहेत त्यावरून शेतकरी अर्ज करत आहेत व फसले जात आहेत.तरी कृपया वरील लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा.

आपल्या ग्रुप ला देखील जॉईन होऊ शकता.

3 thoughts on “उत्पन्न दुप्पट करणारी कुसुम योजना आहे तरी काय?सविस्तर संपूर्ण माहिती: Kusum Yojana Online Registration Form”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top