Lampi Nuksan Bharpai: लंपी आजारामुळे आपले पशुधन दगावले असल्यास शासनाकडून मिळणार प्रति गाई साठी 35000 मदत

lampi nuksan bharpai gr

Lampi Nuksan Bharpai:शेतकरी बंधूंनो आपलं जर पशुधन हे लंबी आजारामुळे जर मृत पावला असेल तर शासनाकडून यामध्ये कृषी पशुसंवर्धन व दुग्धव्यसकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून Lampi Nuksan Bharpai  मिळणार आहे. तर मदत कीती मिळणार आहे ,कशा स्वरूपात आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.

Lampi Nuksan Bharpai:

शेतकरी बंधूंनो जर आपलं पशुधन जर लंबी आजाराने मृत पावला असेल तर हा लेख आपण अवश्य वाचा कारण की याच्यामध्ये आपल्याला  Lampi Nuksan Bharpai मदत शासनाकडून जाहीर झालेले आहे. याबाबतचा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे.चला तर मग आपण सविस्तर माहिती पाहूया.

नुकसान भरपाई मंत्रिमंडळ निर्णय:

शेतकरी बंधूंनो राज्यात पशुधनांमध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य व संशोधिक लंबी प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी पशुपालकांकडे पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकऱ्यांना पशुपालकांना 12 /09/ 2022 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळांनी दिलेले निर्देशानुसार केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या धोरणानुसार महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय 2015 मधील निकषानुसार Lampi Nuksan Bharpai  अर्थसहाय्य देण्याच्या अनुषंगाने नियोजन व वित्त विभागाच्या संमतीने या विभागात शासन निर्णय हा  प्रदर्शित करण्यात आलेला आहे.

कधीपासून मृत झालेल्या जनावरांचा मृत्यू झाल्यास मिळणार मदत:

दिनांक 04/10/2022 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाचे बैठकीमध्ये 4 ऑगस्ट 2022 पासून लंबी प्रादुर्भावामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना अर्थसहाय्य देताना केंद्र शासनाच्या आपत्ती राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणाच्या निकषाप्रमाणे Lampi Nuksan Bharpai मदत  दिली जाणार आहे.तरी याबाबत राज्य सरकारने देखील त्या दृष्टीने शासन निर्णय जो आहे तो जाहीर केलेला आहे.
सर्व गोष्टीचा विचार केल्यानुसार 04/08/ 2022 पासून ज्या शेतकऱ्यांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी पशुधनांना अर्थसहाय्य देताना आपत्ती निवारण धोरणातील आर्थिक निकषाप्रमाणे सर्वांना अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे अर्थसाहाय्य देताना विचार घ्यायच्या मृत पशुधनाच्या संख्येवरील प्रत्येक कुटुंब निर्बंधांचे निकष सुद्धा काढून घेण्यात आले आहे.

त्यामुळे लंपी चर्मरोग प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या सर्व पशुधनाच्या मालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणात पुढील प्रमाणे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे

किती मदत मिळणार?

  1. दुधाळ जनवारे जर असेल तर पस्तीस हजार रुपये आपल्याला प्रति गाई रक्कम मिळणार आहे.
  2. ओढकाम करणारे जनावरे असतील उदाहरणार्थ बैल व इतर यांना 25 हजार रुपये प्रति जनावर एवढे मिळणार आहेत
  3. या व्यतिरिक्त जर वासरे मृत पावले असतील तर त्यांना सोळा हजार रुपये प्रति वासरू एवढी रक्कम शासनाकडून मदत मिळणार आहे.Lampi Nuksan Bharpai

अर्थसहाय्य अदा करण्यासाठी विहित करण्यात आलेल्या  शासन निर्णययातील कार्यपद्धतीत कोणता बदल करण्यात आलेला नसून ही कार्यपद्धती तसेच लागू राहील.

अधिकारी वर्गाकडून सूचना जारी:

या अनुषंगाने आवश्यक असणाऱ्या सर्व सूचना आयुक्त पशुसंवर्धन पुणे यांनी तत्काळ सर्व क्षत्रिय अधिकाऱ्यांना सूचना निर्गमित करण्यात यावे अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेले आहेत.

कोठे फॉर्म भरायचा?

तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर आपली जनावरे मृत पावली असतील आणि याचा जर आपल्याला रक्कम हवी असेल तर त्यासाठी आपल्याला जवळील पशुधन अधिकारी यांच्याशी संपर्क करायचा आहे त्यांच्याकडे आपल्याला फॉर्म भरून या संदर्भात आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे व आपल्याला या Lampi Nuksan Bharpai  आपल्याला मिळून घ्यायचे आहे.

तर अशा प्रकारे आपल्याला याचा शासन निर्णय शासनाने जाहीर केलेला आहे आपण जवळील पशुधन अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपल्या पशुधनाचा अर्थसहाय्य फॉर्म आपण भरू शकता.

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Lampi Nuksan Bharpai आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Lampi Nuksan Bharpai  लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

 

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top