Edit Post

आता मोबाईलवर शेतजमीन मोजा; तेसुध्दा गुंठा, एकर, हेक्टरमध्ये : Land Measurement Using App

Land Measurement : मित्रांनो, वेळप्रसंगी किंवा शेतीबद्दलचे वाद निर्माण झाल्यास आपल्याला शेतजमीन मोजणी (Land Measurement) करावी लागते. त्यासाठी मोजणी करण्यात येणाऱ्या योग्य त्या व्यक्तीला नोंदणी करून मोजणीसाठी घेऊन जावे लागते. हे सर्व प्रक्रिया वेळ खाऊ त्याचप्रमाणे किचकट आहे.

महसूल विभाग मोठ्या प्रमाणावर डिजिटायझेशन करत असल्यामुळे जणू आपल्याला शेतीची सर्व काम सोपी वाटू लागली आहेत. शेतीमध्ये वेगवेगळे तंत्रज्ञान (Technology) आल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीतील काम एकदम सोपे झाले आहे.

Land Measurement Using App

महसूल विभागामार्फत शेतकऱ्यांना मोबाईलवरती विविध सुविधा देण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे, ज्यामध्ये ई-पीक पाहणी, डिजिटल सातबारा (Digital Land Record), पीकविमा (Crop Insurance), पीकविमा नुकसान सूचना इत्यादी सुविधांचा समावेश आहे.

मित्रांनो, आज आपण शेतकरी कशाप्रकारे स्वतःच्या मोबाईलवर आपली शेतजमीन (Land Record) मोजू शकतात ते सुद्धा एकर गुंठा अथवा हेक्टरमध्ये तर चालू पाहुयात यांसदर्भातील माहिती.

शेतजमिनीसाठी एक जबरदस्त अँड्रॉइड एप्लीकेशन आहे ज्याच्या मदतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने आपल्या जमिनीची मोजणी करू शकतो. तर चला पाहूयात या ॲपच्या मदतीने जमिनीची मोजणी (Land Measurement) कशी करावी.