Maha reshim Abhiyan Maharashtra:महारेशीम अभियान 2023 तुती व टसर क्षेत्र नोंदणी कार्यक्रम 15 नोव्हेंबर पासून १५ डिसेंबर पर्यंत राबवण्यासाठी राज्य शासनाच्या सहकार व पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्यामार्फत हा उपक्रम हाती घेतलेला आहे.त्याच बरोबर हा उद्योग सुरु करण्यासाठी सरकार कडून ३ लाख इतका निधी मिळणार असून तो कसा मिळवायचा याबदल सर्व माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत.चला तर मित्रांनो हा लेख सुरु करूया.MMaha reshim Abhiyan Maharashtra
Maha reshim Abhiyan Maharashtra:
राज्य शासनाच्या सहकार व पणन व वस्त्रोद्योग धोरण हे फेब्रुवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे जाहीर करण्यात आलेले आहेत. रेशीम उद्योग कृषी व वनसंपत्तीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. महाराष्ट्रातील हवामान व उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादनास राज्यात भरपूर वाव आहे . राज्याचा कृषी विकासदर वृद्धीबरोबर ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक स्थर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा उद्योग आहे.Mahareshim Abhiyan 2023
परंतु शेतकऱ्यांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावरती या उद्योगाकडे वळलेले दिसून येत नाहीत, ही बाब लक्षात घेऊन सन 2018 पासून 2023 या वस्त्र उद्योग धोरण कालावधीत रेशीम उद्योगाला राज्यातील अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी अनेक उपाययोजना हाती घेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत.
नवीन तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याकरता प्रत्येक वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या संस्थेच्या सहकार्याने महारेशीम अभियान राबविण्यात येईल असे वस्त्रोद्योग धोरणात नमूद आहे.reshim Udyog Maharashtra
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
महा रेशीम अभियान 2022:
या अभियानास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी होऊन रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यास मदत मिळावी या दृष्टीने महा रेशीम अभियान 2023 राबवण्याचा विचार राज्य शासनाने हाती घेतलेला आहे.
राज्यात रेशीम शेतीचे महत्व व त्यातून मिळणारा हमखास व शाश्वत उत्पन्नाची शेतकऱ्यांना माहिती व्हावी याकरिता प्रचार व प्रसिद्ध करण्यासाठी तसेच सन 2023 मध्ये तुती लागवड व टसर रेशीम लाभार्थ्यांची नाव नोंदणी करण्यासाठी 15 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान 2023 राबविण्यासाठी शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे याबाबतचा शासन निर्णय देखील प्रसिद्ध केला आहे तो आपण लेखाच्या शेवटी पाहू शकता.reshim Udyog Maharashtra
Reshim Udyog Maharashtra:
शेतकरी बंधूंनो आपण देखील व्यवसायामध्ये जर इच्छुक असाल तर याच्यामध्ये 3 लाख रुपयापर्यंत राज्य शासनाकडून अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे आपण हा व्यवसाय सुरू करून यामध्ये नक्कीच पैसे कमवू शकता आणि या व्यवसायाबद्दल माहिती घेऊ शकता.
तर शेतकरी बंधूंनो आपल्याला जर यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर पंधरा तारखेपासून हा उपक्रम राज्यामध्ये सुरू झालेला आहे.आपल्याला पुणे या ठिकाणी जाणं आवश्यक आहे.Mahareshim Abhiyan 2023
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा