Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra – १ मुलगी असेल तर मिळेल ५०००० व २ मुलींसाठी मिळणार २५-२५ हजार

Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra:नमस्कार आजच्या या लेखामध्ये आपण Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.आपल्याला यामध्ये १ मुलगी असेल तर मिळेल ५०००० व २ मुलींसाठी मिळणार २५-२५ हजार रुपये मिळणार आहे ते कसे मिळतील याविषयी माहिती पाहणार आहोत चला तर मग हा लेख आपण सुरु करूया कृपया हा लेख पूर्ण वाचा अगदी परिपूर्ण माहिती आपल्याला या एकाच लेखामध्ये मिळेल.

Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra:

मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी आणि स्त्री शिक्षणाला मोठ्या प्रमाणावर  प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने १ एप्रिल २०१६ रोजी “माझी कन्या भाग्यश्री” हि योजना सुरू केली. या योजनेंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत राज्यातील आई किंवा वडिलांनी नसबंदी करून घेतल्यास, सरकारकडून मुलीच्या नावे 50,000 रुपये बँकेत जमा केले जातात.  माझी भाग्यश्री कन्या योजना  अंतर्गत दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर पालकांनी कुटुंब नियोजन दत्तक घेतले असेल, तर नसबंदीनंतर दोन्ही मुलींच्या नावे 25000-25000 रुपये बँकेत जमा केले जातील. अशी हि योजना आहे त्यासाठी काय प्रक्रिया आहे ते आपण पाहूया.

Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra:

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकाच व्यक्तीच्या दोन मुलींनाच लाभ दिला जाणार आहे.Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra

अंतर्गत, मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत पालकांना नसबंदी करणे आवश्यक आहे आणि दुसरी मुलगी जन्मल्यानंतर 6 महिन्यांच्या आत नसबंदी करणे बंधनकारक आहे. या योजनेअंतर्गत, पूर्वी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे (BPL) ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपर्यंत होते.ते यामध्ये पात्र होते

आता सध्या  नवीन धोरणानुसार या योजनेंतर्गत मुलीच्या सर्व  कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांवरून ते आत्ता 7.5 लाख रुपये करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 7.5 लाख रुपये आहे ते देखील या योजनेसाठी पात्र असतील.त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.

योजनेचा चालू करण्यामागचा हेतू:

मित्रांनो  मुलींना ओझं मानणारे आणि मुलींना मारणारे आणि मुलींना जास्त शिक्षण घेऊ न देणारे  असे असंख्य लोक या जगामध्ये आहेत आणि त्यामध्ये जे निरीक्षर आहेत त्यांची मानसिकता बदलने गरजेचे आहे.त्यामुळे या सर्व अडचणी  लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra  ही योजना सुरू केली आहे. मुलींचे प्रमाण सुधारण्यासाठी, त्यांची संख्या जास्त व्हावी मुलींची प्रगती व्हावी यासाठी लिंग निर्धारण आणि स्त्री भ्रूणहत्या थांबवण्यासाठी ही योजना चालू केली गेली आहे. या Majhi Kanya Bhagyashri Yojana च्या माध्यमातून मुलींना शिक्षणाकडे प्रवृत्त करणे आणि राज्यातील लोकांची नकारात्मक विचारसरणी बदलणे तसेच मुलींचे भविष्य उज्ज्वल करणे हा या योजनेमागचा हेतू आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

 • अर्जदार हा महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असावा.
 • जर एखाद्या व्यक्तीला दोन मुली असतील तर त्याला Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra अंतर्गत लाभ मिळू शकतात.
 • तिसरे अपत्य जन्माला आल्यास आधीच जन्मलेल्या दोन्ही मुलींनाही या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही.
 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक
 • मोबाईल नंबर
 • उत्पन दाखला
 • रेशन कार्ड
 • फोटो

पैसे कसे व कधी मिळणार आहेत?

या योजनेत व्याज रक्कम लगेच मिळणार नाही सर्वप्रथम  पहिल्यांदा मुलगी 6 वर्षांची होईल आणि दुसऱ्यांदा मुली 12 वर्षांची झाल्यावर व्याजाचे पैसे मिळतील.

जर मुलीने 18 वर्षे पूर्ण केली तर ती मुलगी पूर्ण रक्कम मिळवण्यास पात्र असेल.

Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra चा संपूर्ण लाभ मिळवण्यासाठी मुलगी किमान 10वी उत्तीर्ण आणि अविवाहित असावी. राज्यातील ज्या पालकांना या योजनेंतर्गत पात्र व्हायचे आहे, त्यांना अर्ज करावा लागेल.

या योजनेअंतर्गत मुलीच्या किंवा तिच्या आईच्या नावाने बँक खाते उघडले जाईल. या खात्यातच राज्य सरकारकडून मुलीच्या नावे बँक खात्यात वेळोवेळी रक्कम वर्ग केली जाईल.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेमध्ये विमा किती आहे?

मुलगी आणि तिच्या आईच्या नावे नॅशनल बँकेत संयुक्त खाते या योजनेअंतर्गत उघडले जाईल आणि यामध्ये दोघांना एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि 5000 रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल. या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर कुटुंबनियोजन (नसबंदी) केले जाते. त्यामुळे 50 हजार रुपये सरकारकडून देण्यात येणार आहे.जर 2 मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले. त्यामुळे सरकारकडून दोघांना 25-25 हजार रुपये दिले जातील.राज्य सरकारने दिलेली रक्कम मुलींच्या शिक्षणासाठी वापरली जावी.

अर्ज कसा करावा:

 • राज्यातील इच्छुक लाभार्थी ज्यांना या Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra अंतर्गत अर्ज करायचा आहे, त्यांना महाराष्ट्र शासन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माझी कन्या भाग्यश्री योजनेचा अर्ज PDF डाउनलोड करावा लागेल.
 • अर्ज डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की नाव, पत्ता, पालकांचे नाव, मुलीची जन्मतारीख, मोबाइल नंबर इ.
 • सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमची सर्व कागदपत्रे फॉर्मसोबत जोडावी लागतील आणि ती तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जमा करावी लागतील त्यानणार आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
 • आपणास याचा फॉर्म हवा असेल तर खालील लिंक वर क्लिक करून आपण फॉर्म क शासन निर्णय पाहू शकता.

 

देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

निष्कर्ष  :

मित्रांनो आज आपण  या लेखा मध्ये Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra बद्दल माहिती घेतली  तर आपल्याला हा Majhi Kanya Bhagyashri Yojana Maharashtra हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेन्ट करून नक्की सांगा आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजणाची माहिती हवी असेल ते देखील कमेन्ट करून कळवा . धन्यवाद

आपण ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकताWestern Naval Command Recruitment 2022

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top