Mata Surkshit tar ghar surakshit: माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत सण 22 23 मधील जिल्हा नियोजन समितीकडील निधी मधून प्रति जिल्हा रुपये दोनशे लाख निधी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने काढण्यात आलेला आहे तरी या शासन निर्णया मार्फत ही योजना नक्की आहे तरी काय याबद्दलची माहिती आपण पाहूया.
Mata Surkshit tar ghar surakshit:
राज्यातील अठरा वर्षावरील महिला माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणी दिनांक 26/09/2022 पासून नवरात्री उत्सवानिमित्त आरोग्य तपासणी कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे
या मोहिमेअंतर्गत राज्यातील अंदाजे चार कोटी महिलांचे आरोग्य तपासणी व औषधोपचार अपेक्षित आहे. या महिलांची तपासणी करण्याकरिता आरोग्य यंत्रणा याव्यतिरिक्त महिला व बालविकास विभाग यांच्या सहकार्याने सदर कार्यक्रम राबवत आहे.सदरचा कार्यक्रम हा पंधरा नोव्हेंबर 2022 पर्यंत असणार आहे.Mata Surkshit tar ghar surakshit
या मोहिमेमध्ये राज्यातील अठरा वर्षावरील महिलांना मातांना गरोदर स्त्रियांना प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि सुरक्षित व सुरूर आरोग्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा हा उद्देश आहे. या मोहिमेच्या अंतर्गत वैद्यकीय अधिकारी व श्री रोग तज्ञ मार्फत 18 वर्षावरील महिलांची नवविवाहित महिलांची तपासणी केली जाणार आहे.Mata Surkshit tar ghar surakshit
माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान:
महाराष्ट्र राज्यातील अठरा वर्षावरील महिलांना आणि गरोदर स्त्रियांना याचा फायदा होणार आहे त्यामुळे राज्य शासनाच्या वतीने विविध उपक्रम हे राबविण्यात येणार आहेत यामध्ये सोनोग्राफी सारखे उपक्रम यामध्ये होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माता भगिनींना याचा फायदा होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य माता-भगिनींमधून एक आनंद व्यक्त केला जात आहे.
दोनशे लक्ष निधीमधून प्रत्येक जिल्ह्याकरता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या स्तरावर ग्रामीण भागासाठी 100 लक्ष व जिल्हा शहरी व महानगरपालिका क्षेत्रासाठी 100 लक्ष निधी याप्रमाणे वितरित करण्यात येणार आहे अशा प्रकारचा शासन निर्णय राज्य शासनाने वितरित केलेला आहे त्यामुळे खरोखरच महिला व माता-भगिनींना याचा फायदा होणार आहे.Mata Surkshit tar ghar surakshit