नांगर खरेदीसाठी मिळणार १००% लाभ-Nangar Kharedi Anudan 2022

Nangar Kharedi Anudan 2022:महाराष्ट्र राज्य सरकार व केंद्र सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नामधून सदर योजना शासनाकडून राबविण्यात येत आहे.यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.यामध्ये शेतकरी यांना विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते.

उदा. नांगर रोटर व स्वयंचलित औजारे रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)अशा असंख्य मनुष्यचलीत व बैलचलीत औजारे यामध्ये आपल्याला मिळणार आहेत.शेतकरी बंधुनो हा फॉर्म आपणा जर भरला तर आपण यामध्ये १००% पात्र होऊ शकता.त्यासाठी हा फॉर्म जास्तीत जास्त शेतकरी वर्ग यांनी भरावा यासाठी सरकार कडून प्रयत्न सुरु आहेत.

Nangar Kharedi Anudan 2022:

सदर योजना हि MAHADBT अंतर्गत असून शासनाकडून राबविण्यात येत असून  यामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी आधार क्रमाांक आवश्यक आहे परंतु आपल्याकडे आधार कार्ड काढल्याची पावती असल्यास आपण यामध्ये सहभागी होऊ शकता.

नांगर योजना अर्ज कसा करावा:

सदर योजनेचा अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात असूनhttps://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर भरणे आवश्यक आहे.

शेतकरी  सीएससी सेंटर मध्ये  किंवा घरी देखील  हा अर्ज भरु शकतात. या संकेत स्थळावर “शेतकरी योजना” हा पर्याय निवडायचा आहे. शेतकरी यांना “वैयक्तीक लाभार्थी” तसेच “शेतकरी गट/एफपीओ/सहकारी संस्था” म्हणुन नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. प्रथम युजर नेम आणि पासवर्ड तयार करुन आपले खाते उघडायचे आहे.नोंदणी मध्ये आपले सर्व आवश्यक माहिती जसं की आपला आधार कार्ड, बँकेची डिटेल ,मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, हे सर्व माहिती टाकून आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे, नोंदणी केल्याच्या नंतर आपले वैयक्तिक माहिती याच्या व्यतिरिक्त आपल्या संपूर्ण सातबारा ची माहिती जसं की सातबारा खाते क्रमांक, सातबारा क्रमांक, क्षेत्र किती आहे, सामायिक असेल तर त्याची माहिती, ही सर्व माहिती टाकून आपल्याला नांगर योजनेसाठी अर्ज करायचा आहे.  अर्ज  ऑनलाइन स्वरूपामध्ये सबमिट होईल  अर्जासाठी रु.20 व जीएसटी रु.3.60 असे एकुण 23.60 रुपये ऑनलाईन शुल्क भरायचे आहे.शेतकरी यांना अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा त्यांना काही सुचना करावयाच्या असतील तर महाडीबिटी पोर्टल वरील “तक्रार/सुचना” या बटन वर क्लिक करुन आपली सुचना नोंदवू शकतात.

लाभार्थी निवड कशी केली जाते?

संगणकीय प्रणालीद्वारे सर्व योजनांसाठी एकत्रित ऑनलाईन सोडत काढली जाते. निवड झालेल्या शेतकरी यांना त्यांच्या मोबाईल वर एसएमएस येईल.  ज्या लाभार्थी यांची निवड झाली नाही आणि ते प्रतिक्षा यादीत आहेत अशा लाभार्थी यांना पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागिल वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा. त्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.शेतकरी यांच्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकरी यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा एसएमएस शेतकरी यांच्या मोबाईल वर पाठवला जातो. शेतकरी यांना पुर्वसंमती आदेश महाडीबिटी पोर्टल वरील त्यांच्या लॉगइन मध्ये उपलब्ध होइल. पुर्वसंमती आदेश पाहण्यासाठी त्यांचा युजरआयडी व पासवर्ड टाकुन पाहू शकतील.त्याच प्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यांवर लाभार्थी शेतकरी यांना एसएमएस येईल. किंवा कृषी अधिकारी आपणास समपर्क करतील

लाभार्थी निवडीसाठी काही प्राधान्य आहे का?

 • 30 टक्के निधी हा महिला खाते दारांसाठी निधी उपलब्ध होईल
 • तर 3 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित आहे.
 • परंतु पुरेशा प्रमाणात अर्ज आले नाही तर सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांचे साठी वापरला जातो.

 

आपले सरकार DBT ची मुख्य वैशिष्ट्ये:

 • शेतकरी कोित्याही वेळी, कुठूनही आपलेसरकार DBT च्या पोटटलवरून नोंदिी करून राज्य /केंद्र परुस्कृत
  कृषी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
 • शेतकरी त्याांनी केलेल्या अर्जाची सध्यस्थिती ते त्यांचा आय डी व पासवर्ड टाकून पाहू शकतात.
  यासाठी ७/१२  ८ अ , आधार , बँक खात्याच्या पासबकु ची प्रत, खरेदीच्या पावतीची प्रत, इ. अपलोड करू शकतात.
 • आपले सरकार DBT नोंदणी वेरीफिकेशन साठी  एसएमएस आमि ईमले आवश्यक आहे.
 • . निवड झाल्यास शेतकरी यांच्या बँक खात्यात थेट पैसे वर्ग करण्याची सुविधा उपलब्ध
 • user id  व password ची सुविधा उपलब्ध

आवश्यक कागदपत्रे:

 • .आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • सात बारा व आठ अ उतारा
 • मोबाईल क्रमांक
 • इमेल

अनुदान किती मिळेल?

या योजनेत आपण जर पात्र झालात तर यासाठी सरासरी४० ते  ५० % पर्यंत अनुदान आहे.

टीप:एकदा फॉर्म भरला तर पुन्हा आपल्याला ५ वर्ष फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही त्यामुळे यामध्ये आपण एकदा फॉर्म भरला तर १००% पात्र होऊ शकता.

फोर्म कसा भरावा सविस्तर माहिती येथे पहा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top