Navinya purn yojana kukutpalan:शेतकरी बंधूंनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत एक नावीन्यपूर्ण योजना या वर्षासाठी सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने असं सांगण्यात आलेला आहे की जर आपण एकदा फॉर्म भरला तर पुन्हा पाच वर्षे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाही. आपल्याला केव्हाही नंबर आपला लागू शकतो तर ही योजना कशा पद्धतीने आहे. या योजनेमध्ये काय फायदे मिळणार आहेत, कागदपत्र कोणती सादर करावी लागणार आहेत, आणि कोणत्या कोणत्या योजना आहेत या सर्व गोष्टींची माहिती आपण पाहूया.
Navinya purn yojana kukutpalan:
सदरील योजना हि राज्य स्थरीय व जिल्हा स्थरीय असून आपल्याला यामध्ये पुढील प्रमाणे लाभ मिळणार आहे.
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- सात बारा किंवा आठ अ उतारा
- रहिवासी दाखला
- तिसरे आपत्य नसल्याचा दाखला
- शासकीय सेवेत नसल्याबाबत स्वयंघोषणापत्र
- मागील तीन वर्षांमध्ये या योजनेचा लाभ न मिळाल्याचा दाखला
- अपंग असल्यास दाखला
- महिला बचत गटाची सभासद असल्यास दाखला
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- दारिद्र्य रेषेखाली असल्यास दाखला
- जातीचा दाखला
- वयाचा दाखला
- शैक्षणिक पात्रतेबाबत दाखला
- रोजगार स्वयंरोजगार असल्यास नाव नोंदणी कार्ड सत्यप्रत
- प्रशिक्षण घेतले असल्यास त्याचा दाखला
योजनेचे नाव
1000 मांसल कुक्कूट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूटपालन व्यवसाय सुरु करणे
लाभार्थी निवडीचे निकष – प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)
२)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )
३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी
किती अनुदान मिळणार
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के- १,१२,५००/-
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के- १,६८,७५०/-
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा
शासन निर्णय पहा
जिल्हा स्थरीय योजना
योजनेचे नाव –
- ८ ते १० आठवडे वयाचा तलंगाच्या २५ माद्या आणि ३ नर वाटप करणे-अनुदान सरासरी १६०००
- एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे -अनुदान सरासरी १६०००
खालील योजना चालू आहेत
- राज्यस्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे- येथे क्लिक करा
- राज्यस्तरीय योजना शेळी व मेंढी गट वाटप करणे – येथे क्लिक करा
- राज्यस्तरीय योजना १००० मा. कुकुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कुटपालन व्यवसाय- येथे क्लिक करा
- जिल्हास्तरीय योजना शेळी मेंढी गट वाटप करणे- येथे क्लिक करा
- जिल्हास्तरीय योजना दुधाळ गाई म्हशीचे वाटप करणे – येथे क्लिक करा
- जिल्हास्तरीय तलांगा वाटप करणे – येथे क्लिक करा
- जिल्हास्तरीय योजना एक दिवशी सुधारित पक्ष्यांच्या पिल्लांचे गट वाटप करणे. – येथे क्लिक करा
शेतकरी बंधुनो वरील योजना चालू असून त्या दिनांक १३ डिसेंबर २०२२ ला चालू झाली असून ११ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहेत.वरील योजनांची माहिती पाहण्यासाठी वरील येथे क्लिक करा वर क्लिक करून माहिती मिळवा.