Sukanya samriddhi yojana 2023
आपल्याला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या मुलीचे वय 10 वर्षे होण्याअगोदर बँकेत खाते काढणेे आवश्यक आहे. व त्यानंतर आपल्याला या योजनेमध्ये ठराविक रक्कम गुंतवावी लागणार आहे. ही रक्कम किमान 250 रुपये ते 1.5 लाख रुपये पर्यंत भरू शकता. पुढे जाऊन या योजनेचा लाभ आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी इत्यादी कामासाठी होऊ शकतो. व या योजनेचे आणखी एक विशेष म्हणजे आपण गुंतवलेल्या रकमेवर 7.60% दराने व्याज दिले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण खाते पोस्ट ऑफिस किंवा व्यवसायिक शाखे मध्ये काढू शकता. या योजनेचा लाभ एका कुटुंबामध्ये 2 मुलींनाच घेता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पाहूयात.
सुकन्या समृद्धी योजना
आवश्यक कागदपत्रे
- मुलीचा जन्म दाखला.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- रेशन कार्ड.
- आधार कार्ड.
- बँक खाते क्रमांक. इत्यादी.
या योजनेची काही नियम व अटी
• खाते उघडण्याची या योजने अंतर्गत मुलीचे खाते हे वयाच्या दहा वर्षे अगोदर असणे आवश्यक आहे.
• या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील दोनच मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
• या योजनेमध्ये पालकांना आपली मुलगी 18 वर्षे होईपर्यंत गुंतवणूक करायला लागते.
अर्ज कोठे करायचं ते पहा
आपल्याला जर या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घ्यायचा असेल. तर यासाठी अर्ज आपण जवळील पोस्ट ऑफिस किंवा जवळील बँकेशी संपर्क साधून या योजनेसाठी अर्ज भरू शकता.
आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर इतरांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.