Post investment scheme : नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी पोस्ट ऑफिसच्या एका नवीन योजना बद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना Definitely अतिशय फायदेशीर ठरणार आहे. या योजनेमध्ये आपण केलेल्या गुंतवणुकीवर 8.5% व याच्यापेक्षा जास्त व्याज दिले जाणार आहे. बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे जाणून घेता येतील. चला तर मग आजच्या या लेखनाला सुरुवात करूयात.
Post investment scheme:-
मित्रांनो ही एक फिक्स डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये 1.5 लाखापर्यंतच उत्पन्न करमुक्त असते. या योजने अंतर्गत गुंतवणूक केल्यास 8.5% व्याज मिळते. 6 महिन्यांनी व्याज जोडले जाते. 5 वर्षानंतर व्याजासहित तुमचे पैसे तुमच्या हातात पडतात. (Post investment scheme)
टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस):-
टीडीएस ही योजना पाच वर्षासाठी आहे. कमीत कमी 200 रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू करू शकता. पहिली 4 वर्ष 8.4% व्याज मिळते. तर पाचव्या वर्षी 8.5% व्याज मिळते. वार्षिक रूपात व्याज मिळते. योजनेत मिळणार व्याज (उत्पन्न) संपूर्ण करमुक्त असतं.
सुकन्या योजना:-
मित्रांनो पोस्ट ऑफिसचे ही स्कीम तुमच्या मुली करता आहे. यामध्ये तुमच्या मुलींच्या नावावर तुम्ही खाते उघडू शकता. या योजनेत एका वित्तीय वर्षात तुम्ही १,००० ते १,५०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या योजनेत सध्य आर्थिक वर्षात ९.२% व्याज दिले जाते. खातं उघडल्यानंतर 14 वर्षापर्यंत तुम्ही पैसे जमा करू शकता. मुलगी जेव्हा 21 वर्षाची होईल तेव्हा तुम्ही पैसे काढून घेऊ शकता.