office 365: दौंड येथे उप-विभागीय कार्यालय स्थापन:
दौंड शहर आणि ग्रामीणमध्ये राहणाऱ्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे, महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या मार्फत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याबाबत मान्यता देण्यात आलेले आहे, याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने 6 ऑक्टोबर 2023 रोजी रोजी प्रसिद्ध केलेला आहे तर हा शासन निर्णय काय आहे याबद्दल माहिती जाणून घेऊया.
शासन निर्णय पहा
office 365: दौंड येथे उप-विभागीय कार्यालय स्थापन
सद्यस्थितीला पुणे जिल्ह्यामध्ये दौंड व पुरंदर या दोन तालुक्यांसाठी एक उपविभागीय कार्यालय असून त्याचे मुख्यालय सासवड पुरंदर येथे आहे तथापि पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याची वाढती लोकसंख्या वाढते औद्योगीकरण व नागरिकरण इत्यादी बाबीमुळे सध्याच्या दौंड पुरंदर या उपविभागीय कार्यालयावर कामकाजाचा मोठा ताण पडत आहे त्यामुळे प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात स्वतंत्र उपविभागीय स्थापन करण्यात आला आहे सदर उपविभागाकरिता स्वतंत्र उपविभागीय कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता तर अशा प्रकारे शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
शासन निर्णय पहा