हरवलेले रेशन कार्ड डाऊनलोड करा १ मिनटात-Online Ration Card Download 2022

Online Ration Card Download 2022:नमस्कार मित्रांनो आपलं  रेशन कार्ड हरवलं असेल आणि ते आपल्याला पुन्हा नवीन काढायचा असेल तर आपल्याला बऱ्याचशा चकरा ह्या महा-ई-सेवा केंद्र असेल, तलाठी कार्यालय  असेल किंवा पुरवठा विभाग असेल अशा ठिकाणी असंख चकरा आपल्याला मारावी लागतात, परंतु तरीदेखील मित्रांनो आपले रेशन कार्ड आहे  आपल्याला मिळत नाही. आणि कित्येक पैसे  रेशन कार्ड साठी आपल्याला द्यावे लागतात.Online Ration Card Download 2022

तर मित्रांनो आजच्या या लेखांमध्ये आपण आपलं रेशन कार्ड ऑनलाइन घर बसल्या आपल्या मोबाईल मधूनच पीडीएफ स्वरूपामध्ये कशाप्रकारे डाऊनलोड करायची याच्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत.तर हा  लेख आपण सविस्तर वाचा व  आपल रेशन कार्ड कशा पद्धतीने डाऊनलोड करता येऊ शकतो याबद्दलची माहिती आहे आपण पाहूया.

Online Ration Card Download 2022:

सर्वप्रथम रेशन कार्ड बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया. रेशन कार्ड हे शासनाचा पत्त्याचा पुरावा म्हणून ओळखलं जातं. या रेशन कार्ड मध्ये कुटुंब मध्ये जेवढी लोक असतात यांची नावे या रेशन कार्ड वरती असतात. शासनाच्या कोणत्याही योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर  रेशन कार्ड आपल्याला पत्त्याच्या पुराव्यासाठी गरजेचं असतं.अशा काही योजना आहेत की त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर रेशन कार्ड  आपल्याला अनिवार्य असतंच.त्यामुळे रेशन कार्ड आपल्याकडे असणे गरजेचे आहे याच्या व्यतिरिक्त भारत सरकारच्या वतीने स्वस्त धान्य  आपल्याला हवं असेल तर हे स्वस्त धान्य मिळवण्यासाठी देखील आपल्याला रेशन कार्ड गरजेच असतं त्यामुळे हे कसे काढावे ते आज पाहणार आहोत.

भारतातील लोकांना सर्वात कमी दरात रेशन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने अनेक मोठी पावले उचलली आहेत. सरकारने वन नेशन वन रेशन कार्ड (ONORC) सारखी प्रणाली देखील सुरू केली आहे.त्यामुळे उदरनिर्वाहासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणारे रेशन कार्ड धारक आता कुठूनही रेशन घेऊ शकतात. म्हणजेच महाराष्ट्रातील व्यक्ती हा गुजरात किंवा अन्य कोणत्याही राज्यात रेशन घेऊ शकतो.Online Ration Card Download 2022

रेशन कार्ड  काढण्याची गरज केंव्हा भासते?

  1. रेशन कार्ड हरविल्यास किंवा गहाळ झाल्यास
  2. रेशन कार्ड खराब झाल्यास किंवा फाटल्यास
  3. रेशन विभक्त करायचे असल्यास
  4. नाव कमी करणे असेल तर
  5. नावात वाढ(उदा.सून किंवा लहान मुल)
  6. नवीन फ्रेश रेशन कार्ड Online Ration Card Download 2022

वरील प्रकारात आपणास रेशन कार्ड हे आपण काढू शकतो

ऑफलाईन रेशन कार्ड मिळविण्यासाठी प्रक्रिया:

सर्वप्रथम रेशन कार्ड ऑफलाईन स्वरूपात मिळवायचं असेल तर कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड लागेल.

रेशन कार्ड नवीन काढण्याचा किंवा दुबार काढण्याचा फॉर्म लागेल

यावरती रेशन दुकानदाराचा सही शिक्का लागेल

याच्या व्यतिरिक्त प्रत्येकाचा आधार कार्ड लागेल.Online Ration Card Download 2022

शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर पेपर वरती आपल्याला प्रतिज्ञापत्र करून देणे गरजेचे राहील

उदाहरणार्थ रेशन कार्ड हरवला असेल किंवा गहाळ झाला असेल किंवा फाटला असेल किंवा नावात वाढ करायची असेल किंवा नाव कमी करायचे असेल अशा प्रकारची माहिती  आपल्याला शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वरती  affidavit करून  हि सर्व कागदपत्रे आपल्याला  तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करायचा आहे.त्यानंतर 21 ते 30 दिवसांमध्ये आपल्याला ऑफलाईन हार्ड कॉपी म्हणजेच original ration card  आपल्याला मिळेल.

रेशन कार्ड प्रकार:

  • अत्यंत गरीब कुटुंब – अंत्योदय
  • दारिद्र्य रेषेखाली – BPL
  • दारिद्र्य रेषेच्या वर : APL

रेशन कार्ड कोणत्या ठिकाणी गरजेचे असते?

  • जीवन विम्यासाठी.
  • ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी.
  • बँक खाते उघडण्यासाठी.
  • महाविद्यालयांमध्ये शाळा.
  • न्यायालयात .
  • रेशन दुकानात धान्य मिळविण्यासाठी
  • मोबाईल सिम कार्ड खरेदी करताना.
  • मतदान कार्ड बनवण्यासाठी.
  • पासपोर्ट बनवण्यासाठी.Online Ration Card Download 2022
  • एलपीजी कनेक्शनसाठी.
  • सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये.
  • निवासस्थानाच्या पत्त्यासाठी.

रेशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन रेशन कार्ड मिळविण्यासाठी प्रक्रिया:

सर्वप्रथम rcms.mahafood.gov.in या वेबसाईटवर जाणे

rcms.mahafood.gov.in

  • त्यानंतर Ration Card या पर्यायावर क्लिक करणे
  • KNOW YOUR RATION CARD यावर क्लिक करणे
  • CAPTCHA टाकून VERIFY करणे
  • नवीन विंडो ओपेन झाली कि त्या ठिकाणी रेशन कार्ड १२ अंकी नंबर टाकणे तो आपल्या रेशन कार्ड वर असतो.
  • जर रेशन कार्ड १२ अंकी नंबर नसेल व तो मिळवायचा असेल तर आपल्या मोबाइल च्या PLAY STORE मध्ये जाऊन MERA RATION हे अप्प डाऊनलोड करणे
  • ते ओपेन करून KNOW YOUR ENTITLEMENT यावर क्लिक करणे नंतर
  • नंतर रेशन कार्ड व आधार कार्ड नंबर विचारेल तेथे आधार नंबर टाकणे
  • नंबर टाकून SUBMIT केले कि लगेच आपला १२ अंकी नंबर येईल
  • आता पुन्हा विरील वेबसाईट वर रेशन कार्ड १२ अंक नंबर टाकणे
  • आपल्याला आपले रेशन कार्ड दिसेल ते आपण PDF स्वरुपात साठवून ठेवू शकताOnline Ration Card Download 2022
  • अशा प्रकारे आपण आपले रेशन कार्ड काढू शकता आणि हि माहिती आपणास कशी वाटली हे आम्हास नक्की कळवा

 

हे देखील वाचा:

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top