Pik Nuksan Bharpai 2022:
राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्टरी १३,६०० रुपये मदत सरकार कडून मिळणार आहे. तसेच दोन हेक्टरऐवजी आता तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.नुकसान भरपाई मधून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत मोठी खबरदारी घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री महोदय यांनी दिली.
पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय:Pik Nuksan Bharpai 2022
मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये १५ लाख हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं त्यासाठी एवढा निधी उपलब्ध केला आहे व गरज पडल्यास आणखी निधी वाढविला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे.
एनडीआरएफच्या नियमांप्रमाणं जेवढी मदत दिली जात होती त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय या सरकार ने घेतला आहे.आणि दोन हेक्टरची मर्यादा वाढवून ती तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळं अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. एनडीआरएफच्या नियमानुसार ६,८०० रुपये मिळत होते. आता दुप्पट म्हणजे १३,६०० रुपये प्रति हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.Pik Nuksan Bharpai 2022
नुकसान भरपाई ची नोंद कोठे व कशी करावी?
शेतकरी बंधूंना आपल्या पिकांचे नुकसान झालेलं असेल तर त्याची नुकसान भरपाई जर आपल्याला मिळवायची असेल तर आपल्याला शासनाकडून वरील प्रमाणे आपल्याला हेक्टर साठी 13 हजार 600 रुपये प्रमाणे म्हंजे ३ हेक्टर साठी ४०८०० एवढी मदत आपल्याला मिळणार आहे.
- आपल्याला आपल्या पिकाचे नुकसान झाले असेल तर त्यासाठी आपण तलाठी कार्यालय या ठिकाणी सदर नुकसानिची माहिती देणे आवश्यक आहे (जरी माहिती दिली नाही तरी शासनाकडून कृषी अधिकारी व महसूल विभाग यांना पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,तरीदेखील तलाठी यांना भेटणे आवश्यक आहे.)
- तलाठी कार्यालय कडून आपल्या पिकाचा पंचनामा केला जाईल.व तसा रेपोर्ट तहसील कार्यालय व प्रशासन यांचेकडे सदर केला जाईल.
- रक्कमेचा लाभ घ्यायचा असेल तर आपला तलाठी कार्यालय या ठिकाणी पंचनामा केल्यानंतर आपला फॉर्म भरून देणे आवश्यक आहे मग त्यानंतर आपल्याला लाभ मिळेल.Pik Nuksan Bharpai 2022
नुकसान भरपाई मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेला आहे अशा शेतकऱ्यांचे आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- सातबारा व आठ अ उतारा
- नुकसान झालेल्या पिकाचा फोटो
- व तलाठी कार्यालय यांच्याकडून पंचनामा केलेला असावा.Pik Nuksan Bharpai 2022
नुकसान भरपाई संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे पहा
नुकसान भरपाई किती दिवसात मिळेल:
शेतकरी बंधुनो आपले नुकसान हे मोठ्या प्रमाणावर झाले आहे.आणि एवढ्या मदतीने आपले नुकसान हे दूर होणार नाही परंतु शासनाच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला नुकसान भरपाई मिळणार आहे व त्यसाठी आपल्या पिकाचा पंचनामा आवश्यक आहे.व सदर पंचनामा करण्याचे संपूर्ण आदेश मुख्यमंत्री महोदय यांनी प्रशासनाला दिले आहेत,संपूर्ण राज्य,विदर्भ-मराठवाडा तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हे,व जिल्हाधिकारी यांना पूर्ण सूचना दिल्या आहेत्यानुसार पुढील महिन्याभरात हि रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे.Pik Nuksan Bharpai 2022
पंचनामा फॉर्म कोठे मिळेल?
पिकाचा पंचनामा फॉर्म आपल्याला हवा असेल तर तो प्रत्येक जिल्ह्यासाठी थोडाफार वेगळा असू शकतो त्यासाठी सदर फॉर्म हा आपल्याला गावातील तलाठी कार्यालय या ठिकाणी उपलब्ध होईल.व तत्यांच्या मार्गदर्शननुसार आपल्याला नुकसान भरपाई लाभ मिळणार आहे.
तर शेतकरी बंधुनो आपण अशा प्रकारे आपल्या पिकाचा नुकसान भरपाई लाभ घ्यावा
याविषयी आपल्याला काही मदत लागली किंवा काही शंका असतील तर आपण मला संपर्क करू शकता
शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.
या योजना देखील बघा :
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी,शिंदे व फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
- जिल्हा परिषद योजना चा लाभ कसा घ्यावा.उदा.तीन एचपी ओपनवेल विद्युत, मोटर पंप संच,पाच एचपी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच,साडेसात एचपी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच,कडबाकुटी यंत्र २ एच पी,पाच एचपी डिझेल इंजिन पंप,कॅरेट प्लास्टिक,प्लास्टिक ताडपत्री,२.५ इंच पी व्ही सी पाईप,३ इंच पी व्ही सी पाईप,२.५ इंच hdpe पाईप,सरी रिझर,औषधाचा पंप,सोलर वॉटर हीटर 200 लिटर
अधिक माहितीसाठी हेल्पलाईन नंबर
abhijeetk2050@gmail.com