हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधीला उत्तर:-
आमदार विनोद अग्रवाल यांनी याबाबत लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार ही माहिती दिली आहे. शेतकरी बांधवांच्या पिकाचे जर नुकसान झाले तर शासनाकडून यापूर्वी हेक्टरी 20000 रुपये इतके नुकसान भरपाई देत होते.
परंतु आता ही रक्कम 40000 रुपयापर्यंत वाढवण्याच्या निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
शेतकरी बांधवांना शेती करत असताना अनेक संकटांचा सामना करावा लागत असतो. यामध्ये जर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतातील पिकांचे नुकसान झालेल्या आढळते तर शासनाकडून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिल्या जाते.
शेतकरी बांधवांना शेतातील पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा काढणे आवश्यक आहे. पिक विमा काढल्यास पिकांचे नुकसान झाले तर पिक विमा कंपनीस एक नुकसानाचा क्लेम सादर करता येतो.
तर आता पीक नुकसान भरपाई तात्काळ मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना यांचा नक्कीच फायदा होणार आहे.।धन्यवाद।