पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 386 पदांची भरती-Pimpri Chinchwad Mahanagrpalika Bharti 2022

Pimpri Chinchwad Mahanagrpalika Bharti 2022:पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६ मध्ये झाली. पिंपरी – चिंचवड हे उद्योगांचे नगर म्हणून नावारुपास आले असले तरी हे केवळ उद्योगनगर नसून क्रांतिकार चापेकर यांची जन्मभूमी असलेले हे नगर । महासाधू मोरया गोसावी यांचे समाधीस्थान म्हणून नावारुपास आलेले शहर. भारतीय स्वातंत्र्य लढासाठी क्रांतिकारक घडविणा-या राष्ट्रीय पाठशाळेचे गाव आणि सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रसिद्ध असलेल्या राजा भोजांच्या राजधानीचे हे शहर आहे. समुद्रसमाटीपासून 530 मी.उंच आहे. पिंपरी – चिंचवड शहराला कोणताही इतिहास नाही किंवा ऐतिहासिक पार्श्र्वभूमी नाही असे बोलले जाते, मात्र त्यामध्ये तथ्य नाही.पिंपरी – चिंचवड शहरातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे भोसरी. भोसरीचे खरे नाव भोजापुरी. भोजापुरी ही राजा भोज यांची राजधानी. भोजापुरी या नावाचा अपभ्रंश भोसावरी व त्यानंतर भोसरी असा झाला आहे. म्हणून या गावाला भोसरी म्हणून ओळखले जाते. भोसरीच्या मोकळ्या रानात एक मातीचे मडके व काही बांधकामाच्या विटा आढळून आल्या असून हे मडके सातवाहन काळातील म्हणजे इ.स.पूर्वी 200 ते 280 च्या काळातील असल्याचे संशोधकांनी सिद्ध केले आहे. तसेच राजा भोजाच्या राजधानीपासून तीन किलोमीटर अंतरावर त्यांच्या दरबारी नाचणा-या कळवतनीची वसाहत होती. त्याला कळवतनीचा महाल असे म्हणत असत. या महालाच्या भिंतीच्या खंगरी विटा, नुकत्याच आढळून आल्या असून त्या वस्तू सुमारे 2000 वर्षापूर्वीच्या असल्याचे तज्ञ्यांनी सिद्ध केले आहे. यावरून हे शहर पुरातन असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत या कळवतनीच्या महालासमोर एक मंदिर असून त्याला कळवतनीचे मंदिर म्हणून ओळखले जाते.

अशा या महानगरपालिकामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.Pimpri Chinchwad Mahanagrpalika Bharti 2022

Pimpri Chinchwad Mahanagrpalika Bharti 2022:

जाहिरात क्र.१८४/२०२२

एकूण जागा – ३८६ जागा 

  • पदाचे नाव:
  • अतिरिक्त कायदा सल्लागार – 01
  • विधी अधिकारी – 01
  • उप मुख्य अग्निशमन अधिकारी – 01
  • उद्यान अधीक्षक – 01
  • सहाय्यक उद्यान अधीक्षक – 02
  • उद्यान निरीक्षक – 04
  • हॉर्टिकल्चर सुपरवायझर – 08
  • कोर्ट लिपिक – 02
  • अनिमल किपर – 02
  • समाज सेवक – 03
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 41
  • लिपिक – 213
  • आरोग्य निरीक्षक – 13
  • कनिष्ट अभियंता (स्थापत्य) – 75
  • कनिष्ट अभियंता (विधुत) – 18

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी   (ii) 07 वर्षे Experience
  2. पद क्र.2: (i) विधी पदवी   (ii) 05 वर्षे Experience
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
  4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) B.E. (फायर) किंवा डिव्हीजनल फायर ऑफिसर कोर्स
  5. पद क्र.5: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)   (ii) 05 वर्षे Experience
  6. पद क्र.6: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)   (ii) 05 वर्षे Experience
  7. पद क्र.7: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)   (ii) 05 वर्षे Experience
  8. पद क्र.8: (i) B.Sc (हॉर्टीकल्चर/फॉरेस्ट्री)   (ii) 05 वर्षे Experience
  9. पद क्र.9: (i) विधी पदवी   (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.    (iii) 03 वर्षे Experience
  10. पद क्र.10: (i) पशु वैद्यकीय डिप्लोमा (ii) 05 वर्षे Experience
  11. पद क्र.11: MSW पदव्युत्तर पदवी
  12. पद क्र.12: (i) शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार.
  13. पद क्र.13: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.    (iii) MS-CIT/CCC
  14. पद क्र.14: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा
  15. पद क्र.15: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा
  16. पद क्र.16: विद्युत अभियांत्रिकी पदवी/डिप्लोमा

वय:१८ ते ३८ पदानुरूप

नोकरी ठिकाण:पुणे

Pimpri Chinchwad Mahanagrpalika Bharti 2022

फॉर्म भरण्याचा type: Online

फॉर्म फी: खुला प्रवर्ग: 1000/-  मागासवर्गीय: 800/-, मा. सैनिक: फी नाही

ऑनलाइन फॉर्म भरण्यास सुरवात: १९ ऑगस्ट २०२२ नंतर

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

अर्ज भरणेसाठी सूचना:

  • उमेदवाराने अर्ज भरताना अचूक पद्धतीने भरावा
  • चुकीची माहिती अर्जामध्ये नमूद केल्यास अर्जदाराचा  अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने अर्ज भरताना जाहिरात पूर्ण पाहून अर्जाच्या सर्व अधिसूचना वाचून अर्ज  हा अचूक online स्वरुपात भरावा

अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top