PM Kisan Yojana Ekyc Last Date:मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण PM Kisan Yojana Ekyc Last Date काय आहे याबद्दल माहिती पाहणार आहोत व ekyc साठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत किंवा ekyc कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत.
महाराष्ट्रसह संपूर्ण भारत देशामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतात. मित्रांनो या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड, बँकेचे पासबुक ,आणि सातबारा धारक असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपण या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता.
केंद्र शासनाकडून राबवण्यात येणारे ही एक अतिशय महत्त्वकांक्षी योजना असून शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचे आहे. शेतकऱ्यांना दैनंदिन जीवन जगत असताना पी एम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या हप्त्याचा मोठा फायदा होत आहे. यामध्ये आपल्याला वार्षिक तीन हप्ते आपल्या खात्यावरती जमा केले जातात. म्हणजेच प्रत्येकी दोन हजार प्रमाणे वर्षाला प्रमाणे सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया केंद्र शासनाकडून राबवली जात असते.
PM Kisan Yojana Ekyc Last Date:
प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्रसह संपूर्ण देशामध्ये यापूर्वी शेतकऱ्यांकडून तपासणी अहवाल मागवला होता. त्यामध्ये आपल्याला आपल्या सातबाराचे मूळ प्रत,आठचे मूळ प्रत, आधार कार्ड चे मूळ प्रत ही कृषी अधिकारी किंवा तलाठी कार्यालय यांच्याकडे सादर करावयासाठी सांगितले होते,
त्यानुसार महाराष्ट्र तथा इतर राज्यातील शेतकऱ्यांनी सदर कागदपत्रे हे तलाठी कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल यांच्याकडे सादर केले होते. परंतु भविष्यामध्ये या योजनेचे पैसे आपल्याला रेग्युलर हवे असतील तर त्यासाठी पी एम किसान सन्मान निधी योजनेची ही केवायसी करणं अनिवार्य आहे.
ई केवायसी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
पी एम किसान सन्मान निधी योजना ही ekyc करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे
- आपले आधार कार्ड
- आधार शी लिंक असणारा मोबाईल क्रमांक
- आधारशी लिंक करणारा मोबाईल नंबर नसेल तर आपल्याला जवळच्या महा-ई-सेवा केंद्र मध्ये किंवा सीएससी सेंटर मध्ये जाऊन बायोमेट्रिकच्या सहाय्याने आपल्याला एक केवायसी करणे आवश्यक आहे
- त्यासाठी स्वतः व्यक्ती सीएससी सेंटर मध्ये उपलब्ध असणे आवश्यक आहे
ई केवायसी करण्याचा शासनाचा हेतू :
शेतकरी बंधूंनो चाळीस कोटीपेक्षा जास्त शेतकरी या योजनेमध्ये सहभागी आहेत व प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या सातबारा वरती फेरबदल होत असतो त्यामुळे सद्यस्थितीला आपल्या सात बारा उताऱ्यावर कोणाचा नाव आहे हे देखील माहिती असणार तेवढेच गरजेचे आहे.
उदाहरणार्थ एकाच सातबारा उतारा वर एकाच गटामध्ये दोन दोन किंवा तीन तीन शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यामुळे त्यामध्ये बेकायदेशीरपणे नोंदी नोंदणी झालेले शेतकरी यांची नावे कमी केली जातील. तसेच जे मृत झालेले शेतकरी आहेत त्यांचे देखील नाव यामध्ये कमी होईल
मृत्यू झाल्यानंतर ज्यांच्या नावे जमीन जाईल त्यांच्या नावे हे पैसे रक्कम जमा केली जाईल त्यासाठी सदर व्यक्तीला हा फॉर्म भरावा लागेल. ज्या शेतकऱ्याच्या नावे जमीन असेल त्याला खात्रीशीर लाभ मिळेल व ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ती सद्यस्थितीला जमीन उपलब्ध नसेल त्यांना यापुढे पैसे मिळणार नाहीत
आपली ekyc झाली आहे का नाही ते पाहण्यासाठी यादीसाठी येथे क्लिक करा
प्रधान मंत्री किसान योजना EKYC शेवट तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भविष्यामध्ये पी एम किसान योजनेअंतर्गत कोणती नावे कमी केली जातील:
भविष्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत जे सामायिक क्षेत्रधारक असतील म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये वारसांनी पाच-सहा लोकांची नावे असतील तर त्या सहा लोकांपैकी कोणतेही एकाच शेतकऱ्याला याचा त्याचा लाभ मिळणार आहे
यापूर्वी संपूर्ण खातेदारांना याचा लाभ मिळत होता तर भविष्यामध्ये हे सामायिक क्षेत्रधारकांमधील कोणत्याही एकाच क्षेत्र धारकाला लाभ मिळणार आहे
याव्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना जमीन पाच एकर किंवा त्यापेक्षा जास्त असेल सद्यस्थितीला जर त्यांना लाभ मिळत असेल तर भविष्यामध्ये देखील यांचा जो लाभ आहे तो कमी होऊ शकतो
ई केवायसी केल्याच्या नंतर ही योजना अतिशय पारदर्शकपणे चालवली जाऊ शकते
त्यामुळे गरजू शेतकऱ्यांपर्यंत याचा जो लाभ मिळू शकतो व भविष्यामध्ये 6000 ऐवजी जास्तीत जास्त हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा असणार आहे
ई केवायसी करण्याची शेवटची तारीख किती आहे ?
केंद्र शासनाकडून वेळोवेळी सांगून शेतकऱ्यांची केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु ही अंतिम तारीख शेतकऱ्यांना 31 ऑगस्ट 2022 अशी ठरवली होती परंतु इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये जास्त प्रमाणावरील शेतकरी ही केवायसी करण्याच्या प्रक्रिया मधून वंचित राहिले होते.
म्हणून या केवायसी वरती जास्तीत जास्त भर देऊन महाराष्ट्र राज्य शासनाकडून संपूर्ण महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामविकास विभाग यांना जे शेतकरी केवायसी पासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्या याद्या प्रसारित करण्यात आल्या होत्या व त्यानुसार त्या त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक संपर्क करून ही केवायसी करण्यासंदर्भात सूचना राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली होतीPM Kisan Yojana Ekyc Last Date
31 ऑगस्ट 2022 पूर्वी आपली केवायसी करून घ्यावी अशा प्रकारची सूचना देण्यात आली होती परंतु तरीदेखील ही जी केवायसी आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील पूर्ण न झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्याकडे विनंती केली की सदर केवायसी ची जी तारीख आहे ती 30 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात यावी
राज्य सरकारच्या अर्जाचा विचार करून केंद्र सरकारने याची तारीख सात दिवसासाठी वाढवून वाढवून दिलेली आहे म्हणजेच आपण ही केवायसी जर आपल्याला करायची असेल तर PM Kisan Yojana Ekyc Last Date 7 सप्टेंबर 2022 पूर्वी रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला बंधनकारक राहील
तर या लेखाच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपली जर केवायसी केलेली नसेल तर आपण ही केवायसी करून घेणे आवश्यक आहेPM Kisan Yojana Ekyc Last Date
आपली केवायसी झालेली आहे की नाही हे कसे चेक करावे?
शेतकरी बंधूंनो आपली केवायसी झालेली आहे किंवा नाही हे जर आपल्याला चेक करायचं असेल तर आपण जवळील सीएससी सेंटर किंवा ई सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता किंवा आपले यूट्यूब चैनल च्या व्हिडिओ मधून देखील याची माहिती मिळू शकतात किंवा आपण तलाठी यांच्याकडे जाऊन पाहू शकता
तलाठी कार्यालय यांच्याकडे वंचित शेतकऱ्यांची यादी पाठवण्यात आलेली आहे त्या यादीमध्ये जर आपलं नाव असेल तर आपण केवायसी करणं बंधनकारक राहील.
घरबसल्या आपल्या मोबाईल मधून ई केवायसी कशी करावी?
- सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान या वेबसाईट वरती जायचं आहे
- त्यानंतर स्क्रीनच्या उजव्या बाजूला एक ईकेवायसी अशाप्रकारे ऑप्शन दिसेल
- त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक आपला टाकायचा आहे
- त्यानंतर आपला मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे
- मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सेंड ओटीपी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे
- ओटीपी सेंड केल्याच्या नंतर पीएम किसान अशा नावाने आपल्या मोबाईल वरती एसएमएस प्राप्त होईल त्यामध्ये चार अंकी ओटीपी क्रमांक असेल तो आपल्याला आपल्या वेबसाईट वरती सबमिट करायचा आहे
- त्यानंतर आपल्याला गेट आधार अशाप्रकारे ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला आपला आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओटीपी जाईल
- त्यानंतर आपल्या मोबाईल वरती आधार नावाने ओटीपी येईल
- सहा अंकी ओटीपी क्रमांक आपल्याला वेबसाईट वर टाकायचा आहे
- आणि सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला केवायसी सबमिटेड सक्सेसफुली अशाप्रकारे हिरव्या अक्षरांमध्ये एसएमएस येईल
- त्याचा स्क्रीन शॉट मारून आपण आपल्याजवळ ठेवू शकता म्हणजे भविष्यामध्ये रेफरन्स साठी आपल्याला गरजेचा असू शकतो
- तर अशा पद्धतीने आपल्यालाही केवायसी करायचे आहे
- जर आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर आपल्या जवळील सीएससी सेंटर मध्ये जाऊन ही केवायसी BIO MATRIC च्या माध्यमातून आपण ही केवायसी करू शकता
- तर शेतकरी बंधूंनो अशा प्रकारे आपल्याला PM Kisan Yojana Ekyc Last Date 7 सप्टेंबर 2022 पूर्वी करणे अत्यंत गरजेचा आहे
- जर आपणही केवायसी केली नाही तर भविष्यामध्ये येणारे पैसे आपले बंद होऊ शकतात तर त्यासाठी आपल्याला आत्ताच केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे
- तर शेतकरी मित्रांनो आपल्याला हा लेख कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट्स मध्ये अवश्य कळवा आपल्याला शेती योजना असतील किंवा महसूल मधील योजना असतील किंवा महसूल मधील अडचणी असतील या अडचणी जर आपल्याला दूर करायचे असतील किंवा आपल्याला जर मोफत सल्ला हवा असेल तर आपण आपल्या यूट्यूब चैनल ला भेट देऊ शकता टेलिग्राम ग्रुप भेट देऊ शकता व्हाट्सअप ग्रुप मध्ये देखील आपण जॉईन होऊ शकता म्हणजे याची डेली अपडेट आणि आपल्या ज्या शंका आहेत त्या अगदी मोफत दूर होतील
आपली ekyc झाली आहे का नाही ते पाहण्यासाठी यादीसाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष:
PM KISAN EKYC LAST DATE याबद्दल आपण माहिती पाहिली. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये आवश्य कळवा”
व ९५६११२२३३२ हा नंबर आपण आपल्याकडे DIGITAL ABHIJEET या नावाने सेव करून आपण whatsapp वर हाय असा SMS पाठवून आपण शासनाच्या नव नवीन योजना STATUS च्या माध्यमातून पाहू शकता
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.