PM किसान पैसे आले नाहीत कारण व उपाय: pmkisan.gov.in:मित्रांनो पीएम किसान सन्मान योजना चा बारावा हप्ता आपल्याला जर आलेला नसेल तर तो का आलेला नाही व तो हप्ता येण्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे. हे आपण आजच्या या एक लेखांमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हा लेख संपूर्ण पहा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती पाठवा म्हणजे ते देखील याच्यावरती कारण शोधून उपाय करतील चला तर हा लेख सुरू करूया.
PM किसान पैसे आले नाहीत कारणे व उपाय: pmkisan.gov.in:
पैसे न येण्याची कारणे:
- आपण जर पी एम किसान योजना ही केवायसी जर केलेली नसेल तर आपल्या खात्यावरती पैसे हे आलेले नसतील
- आपल्या आधार क्रमांकाची बँक लिंक नसेल तरी देखील पैसे आपल्याला मिळणार नाहीत
- आपल्या आधार क्रमांक ला बँक लिंक आहे परंतु ते खातं इन ॲक्टिव्ह आहे अशावेळी आपल्याला पैसे मिळणार नाहीत
- आपल्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले आहेत परंतु आपल्याला दाखवत नाहीत अशावेळी आपल्या बँक खात्यावरती आपण यापूर्वी कर्ज काढलेला असावं आणि ते आपण भरलेलं नसेल तरी देखील आपल्याला हप्ता आलेला असेल तर तो बँक वजा करून घेईल त्यामुळे ते आपल्याला पैसे मिळणार नाहीत
पैसे पुन्हा आपल्या खात्यावर येण्यासाठी उपाय:
- जर केवायसी केली नसेल तर केवायसी करून घ्यावी पुढील येणार हप्ता आपल्या खात्यावरती जमा होईल
- जर आपल्या आधार क्रमांकाची कोणतीच बँक लिंक नसेल व जर आपलं कोणत्याही नॅशनल बँकेमध्ये खात नसेल अशावेळी आपण नवीन खाते काढून आपल्या आधार क्रमांकाची बँक लिंक करू शकता पुढे येणार हप्ता नवीन खात्यावरती येऊ शकतो
- माझे यापूर्वीचे पैसे एचडीएफसी बँकेमध्ये येत आहेत. आता मला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये जमा करायचे आहेत अशा वेळी आपल्याला आपल्या बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेमध्ये जाणे आवश्यक आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आधार शेडिंग फॉर्म हा भरून देणे आवश्यक आहे. फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्या आधार क्रमांक शी बँक लिंक होईल आणि पुढे येणार हप्ता आपला बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये चालू होईल
- आपले खाते जर इन ॲक्टिव्ह असेल तर ते पुन्हा ऍक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये जाऊन आधार शेडिंग फॉर्म भरून आपण ऍक्टिव्ह करू शकता.
अशाप्रकारे यावरती उपाय आहेत आपल्याला जर काही अडचणी असतील शंका असतील तर आपण आम्हास विचारू शकता