पीएम किसान (pmkisan) योजनेचा 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावरती आल्यानंतर आता शेतकऱ्यांना पुढील हप्ता म्हणजेच 13 वा हफ्त्याची आस लागलेली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी दोन हजार रुपये याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपये मानधन तत्वावर दिले जातात.

Pmkisan Scheme 13th Installment
आतापर्यंत केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावरती पीएम किसान योजनेचे 12 हप्ते जमा करण्यात आलेले असून तेरावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावर जमा करण्यात येईल अशी माहिती विभागामार्फत देण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे की माझा हप्ता येईल की नाही. 13वा हप्ता येण्यासाठी खालील काही महत्त्वाच्या बाबी देण्यात आलेले आहेत त्या काळजीपूर्वक वाचून घ्या !
मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे; पीएम किसान योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मध्यंतरी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले, ज्यामध्ये ई-केवायसी (ekyc) असेल किंवा Land Record अद्यावत करणे असेल हे मुख्यत्वे बद्दल करण्यात आले.
13 वा हफ्ता येण्यासाठी हे नक्की करा !
- जर तुम्ही पीएम किसान योजनाअंतर्गत अद्याप ekyc केलेली नसेल, तर तुम्हाला पीएम किसान च्या अधिकृत पोर्टलवर जाऊन सर्वप्रथम kyc करावी लागेल.
- Kyc करण्यासाठी तुमच्या आधार क्रमांकाला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे.
- मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर, तुम्ही तुमच्याजवळ केंद्रावर केवायसीची प्रक्रिया पूर्ण करू शकता.
- त्यानंतर महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा बँक अकाउंट NPCI सर्व्हरला लिंक असणे महत्त्वाचे आहे.
- बँक अकाऊंट NPCI सर्व्हरला लिंक नसल्यास संबंधित बँकेमध्ये जाऊन फॉर्म भरून तुम्ही तुमचा बँक अकाउंट NPCI सर्व्हरला लिंक करू शकता.
१३ व्या हप्त्याची तारीख पहा
अधिक माहिती साठी आपल्या ग्रुप ला जॉईन व्हा