Pune Mahanagarpalika Scholarship 2022: पुणे महानगरपालिकेमार्फत १० वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत व १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक अर्थसहाय्य योजने अंतर्गत पुढील शिक्षणासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कार्यान्वित आहे. एका शैक्षणिक वर्षात जास्त अर्ज आल्यास पुणे महानगरपालिकेने अर्थसंकल्प मधील वरील योजनेसाठी तरतूद केलेल्या रकमेतून समान रक्कम अर्थसहाय्य म्हणून देणार आहे.Pune Mahanagarpalika Scholarship 2022
मित्रांनो या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत.आपणास विनंती असेल हा लेख आपण संपूर्ण पहाआणि आपणास जर काही समस्या किंवा इतर माहिती हवी असेल तर आपण आम्हास कमेंट मध्ये आवश्य कळवा,चला तर आपण पाहूया याचा लाभ कसा घेयाचा.
पुणे शहराची स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या पुणे महानगरपालिकेची स्थापना इ.स. १९५० साली झाली. वरं जनहितं ध्येयम् असे या महापालिकेचे बोधवाक्य आहे.
इंद्रधनुष्य पर्यावरण व नागरिकत्व केंद्र हे महानगरपालिकेचे पर्यावरण संबंधी जनजागृती केंद्र आहे. हे केंद्र नवी पेठ, राजेंद्रनगर, म्हात्रे पुलाजवळ स्थित आहे.
Pune Mahanagarpalika Scholarship 2022:
पुणे महानगरपालिकेच्या वतीने दहावी आणि बारावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य म्हणून या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. सदरचे अर्थसहाय्य उपलब्ध रक्कम व प्राप्त अर्ज याचा विचार करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या वतीने सादर केलेली आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सुधारित शिक्षण अर्थसहाय्य योजना अंतर्गत काही नियम व अटी सादर करण्यात आलेला आहे. व या नियम व अटींना अनुसरून मुलांच्या पालकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर हा अर्ज कशा पद्धतीने करायचा या सर्व गोष्टींची माहिती आपण सविस्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत.Pune Mahanagarpalika Scholarship 2022
योजना काय आहे व किती अर्थसहाय्य मिळणार:
दहावी आणि बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अर्थसहाय्य देण्यासाठी महानगरपालिकेच्या या दोन योजना आहेत. दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये) रुपयांची मदत देणारी भारतरत्न मौलाना आझाद शैक्षणिक अर्थसहाय्य योजना असून बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना २५,०००/- (अक्षरी रुपये पंचवीस हजार) रुपयांची मदत करणारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शैक्षणिक योजना आहे या योजनेचा मुख्य हेतू हाच आहे कि विध्यार्थी यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी मदत व्हावी व त्यांना त्यांच्या कला गुणांना वाव मिळवा त्यासाठी हि योजना चालू करण्यात आली आहे.Pune Mahanagarpalika Scholarship 2022
Pune Mahanagarpalika Scholarship 2022 पात्रता व निकष:
- योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थी/विद्यार्थीनी जर ४० टक्के अपंग असेल तर अशा विद्यार्थी/विद्यार्थीनीला दहावी किंवा बारावीमध्ये किमान ६५ टक्के गुण असणे आवश्यक
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनीने दहावी किंवा बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतलेला असावा
- पुणे महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा रात्रशाळेतील विद्यार्थी असल्यास किंवा मागासवर्गीय विद्यार्थी असल्यास अशा विद्यार्थ्याला किमान ७० टक्के गुण असणे आवश्यक.Pune Mahanagarpalika Scholarship 2022
- या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्याला शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावी किंवा बारावीमध्ये कमीत कमी ८० टक्के गुण असणे आवश्यक.
- योजनेचा लाभ घेणारा विद्यार्थी/विद्यार्थीनी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील रहिवासी असावा.
- विध्यार्थी किंवा पालक यांनी अर्ज हा ऑनलाईन स्वरुपात भरावा
योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज कसा करावा:
- सर्व प्रथम https://www.pmc.gov.in या वेबसाईट वर जाऊन आपले पूर्ण नाव मोबाईल क्रमांक,इमेल,user id पासवर्ड तयार करून आपण नोंदणी करणे त्यानंतर आपल्याला आय डी पासवर्ड मिळेल तो जपून ठेवायचा आहे.Pune Mahanagarpalika Scholarship 2022
- URBAN COMMUNITY- NAGARVASTI DEVE SCHEME – SAMAJ VIKAS VIBHAG येथे क्लिक करून आपली सर्व माहिती ,जातीची माहिती इतर सर्व माहिती भरून बँक माहिती भरून आपल्याला अर्ज भरायचा आहे.त्यानंतर अर्ज पूर्ण झाले कि आपणास त्याची पावती व टोकन (अर्जाची प्रत)मिलेल.
अर्ज करण्यासाठी वेबसाईट
फॉर्म साठी आवश्यक कागदपत्रे पहा
या फॉर्म संधर्भात आपल्याला काही मदत हवी असल्यास व हा लेख कसा वाटला हे आम्हास कमेंट मध्ये नक्की कळवा
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक:
अधिक माहितीसाठी 18001030222 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.
हे देखील वाचा:
आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा.
आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा.
सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा.