महाराष्ट्रात कधी न पाहिलेला रस्ता.नानगांव दापोडी रस्त्याची दुरावस्था: PWD Road दौंड:
नानगांव
नानगांव ता-दौंड,जि-पुणे येथील नानगांव ते दापोडी व दापोडी ते टोलनाका रस्ता हा अतिशय जिंर्ण झाला असून तो वाहतुकीसाठी पूर्णपने निकामी झाला आहे.यावर्षी झालेल्या मोठ्या प्रमाणावरील अतिवृष्टी मुळे रस्ता हा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे,व तो वाहुकीसाठी अतिशय खराब झाला आहे.
सदर रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पावसामुळे खड्डे पडले आहेत.परंतु प्रशासनकडून त्यावर कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही.सध्या कारखाना सीजन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उस वाहतूक त्याच रस्त्याने होत आहे,त्यामुळे मोठ्या खड्ड्यातून वाहतूक करून ऊस कारखान्यावर पोहोच करणे मोठे कसरतीचे काम झाले आहे,त्यामध्ये उसाच्या टेलर ची पलटी होऊन अपघात घडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.
विध्यार्थ्यांना व प्रवाशांना सदर रस्त्यावरून प्रवास करत असताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर रस्त्याचे काम हे लवकरात लवकर करण्यात यावे अशा प्रकारची ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.
प्रशासनाने सदर रस्त्याची दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी अपेक्षा विध्यार्थी वर्ग ग्रामस्थांकडून होत आहे.