Ramai awas yojana form:आपण जर एससी प्रवर्गांमधील असाल तर आपण रमाई आवास योजनेच्या अंतर्गत घरकुल योजनेचा आपण लाभ घेऊ शकता.त्याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे आपण पाहूया.
Ramai awas yojana form:
अर्ज करण्याची प्रक्रिया:
सर्वप्रथम आपला अर्ज व अर्जाबरोबर आवश्यक ती सर्व खालील कागदपत्रे आपल्याला जोडून ग्रामसभेचा ठराव याबरोबर जोडावे लागणार आहे. त्यानंतर हा सर्व सेट एकत्र गोळा करून आपल्याला पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यानंतर आपल्या प्रकरणाला मंजुरी येते आणि मग त्यानंतर आपल्याला आपलं घरकुल बांधण्यासाठी सांगितलं होतं त्यानंतर आपण घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकता.सर्व प्रक्रिया हि ग्रामपंचायत मार्फत होत असते.त्यासाठी आपण ग्रामसेवक यान भेटणे आवश्यक आहे जर आपणास काही अडचण निर्माण झाली तर आपण आम्हास कमेंट मध्ये विचारू शकता.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- आठ उतारा
- जातीचा दाखला
- अपंग असल्यास अपंगाचा दाखला
- विधवा असल्यास विधवा दाखला
- यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
- रहिवासी स्वयंघोषणापत्र
- रेशन कार्ड
- ग्रामसभेचा ठराव व इतर आवश्यक कागदपत्रे
फॉर्म डाऊनलोड करा
रमाई आवास योजना शासन निर्णय पहा