ration card online maharashtra : नमस्कार मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्यातील जवळपास सर्व जनसामान्य नागरिकांना शासनामार्फत मोफत रेशन धान्य वाटप केलं जातं. राशन धान्य राशन दुकानदारामार्फत वाटप केलं जातं; परंतु नेमकं कोणत्या कुटुंबाला किती धान्य दिल जाते. यासंदर्भात त्यांच्यामार्फत सविस्तर माहिती देण्यात येत नाही.
आजचा आपला हा लेख त्यासंदर्भातीलच असणार आहे. आपण घरबसल्या कश्याप्रकारे फक्त पाच मिनिटांमध्ये आपल्याला मिळत असलेल्या रेशन धान्याची माहिती मोबाईलवर पाहू शकतो, ते आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
ration card online maharashtra
तुम्हाला राशन किती मिळते; तुमचा आधार क्रमांक टाकून खालीलप्रमाणे चेक करा
- सर्वप्रथम तुम्हांला राशन धान्य किती भेटतं ते पाहण्यासाठी Play Store वरून एक अँप्लिकेशन इन्स्टॉल करावा लागेल.
- अँप्लिकेशनच नाव आहे, “मेरा रेशन” अँप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायच आहे.
- अँप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड दिसेल ज्यामध्ये विविध पर्याय दिसतील.
- त्या विविध पर्यायांपैकी Know Your Entitlement या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
- त्यानंतर तुम्हाला २ पर्याय दिसतील Ration Card Number व Aadhar Card Number, तुमच्या जवळ जो नंबर असेल तो तुम्ही टाकून पुढील माहिती पाहू शकता.
- जर तुमच्याकडे आधार क्रमांक असेल तर तुम्ही आधार कार्डचा क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
- जर तुमच्याकडे रेशन क्रमांक असेल तर, रेशन कार्डक्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
- आधारकार्ड किंवा रेशनकार्ड क्रमांक टाकून सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या रॅशनकार्ड संदर्भात संपूर्ण माहिती दाखविली जाईल.
दाखविण्यात आलेल्या माहितीमध्ये रेशन धारकांचे संपूर्ण नाव, राज्य, जिल्हा, रॅशनकार्डच प्रकार, कोणत्या योजनेमधून रेशन दिल जात इत्यादी माहिती दाखविली जाते. सोबतच गहू, तांदूळ किती रुपये किलो दिलं जात याबद्दलची सुद्धा माहिती दर्शविण्यात येते.
तुम्हांला नमूद कितीपेक्षा जास्त भावाने गहू किंवा तांदूळ धान्य रेशन दुकानदारांमार्फत देण्यात येत असल्यास त्यासंदर्भात तुम्ही तक्रार करू शकता. अश्याप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण घरबसल्या आपल्या मिळत असलेल्या रेशन धान्याची माहिती मोबाईलवर पाहू शकतो.