Reshim Udyog Anudan : रेशीम उद्योगासाठी शासनाकडून मिळणार ३ लाख अनुदान: १००% अनुदानावर १००% लाभ

reshim udyog

Reshim Udyog Anudan:नमस्कार मित्रांनो आपल्याला जर रेशम व्यवसाय सुरू करायचा असेल, तर मित्रांनो यामध्ये राज्य शासनाने ,केंद्रशासन यांच्याकडून जवळपास 2 लाख 82 हजार ते तीन लाख रुपये पर्यंत आपल्याला संपूर्ण अनुदान मिळणार आहे.

तर या योजनेसाठी आपल्याला लाभ कशा पद्धतीने घ्यायचा आहे या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. जर मित्रांनो आपल्याला खरोखरच रेशीम उद्योग तुती व्यवसाय जर करायचा असेल तर, आपण हा लेख वाचला तरी यामधून आपल्याला अनुदान लाभ कसा घ्यायचा याची माहिती’ मिळणार आहे व त्याचे संपूर्ण प्रक्रिया आपण पाहणार आहोत चला तर हा लेख आपण सुरू करूया.Reshim Udyog Anudan

Reshim Udyog Anudan:

रेशीम उद्योग सुरू करण्यसाठीम्हणजेच तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकाम करण्यासाठी आपल्याला शासनाकडून जवळपास तीन लाख रुपयापर्यंतच अनुदान याच्यामध्ये मिळणार आहे. ही सर्व रक्कम ही ना परतावा तत्त्वावरती असणार आहे. त्यामुळे या योजनेबद्दल सर्वसामान्य जनतेला आणि रेशीम उद्योग सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.Reshim Udyog Anudan

सर्वप्रथम रेशीम उद्योग काय आहे ते पाहूया:

रेशीम शेती हा भारत देशामध्ये सर्वोत्तम असणारा उद्योग आहे . रेशीम उत्पादनासाठी रेशीम किडे पाळले जातात .
याला रेशीम पालन किंवा रेशीम कीटक पालन असे देखील म्हटले जाते.हे रेशीम हा एक बारीक चमकदार फायबर चा प्रकार असून ज्या पासून कपडे विणले जातात.Reshim Udyog Anudan
सदर कपडे फिलामेंटस सेल मध्ये राहणाऱ्या वर्मस पासून तयार केले जाते. अश्या प्रकारे रेशीम शेती केली जाते याला रेशीम शेती म्हणतात.

रेशीम शेतीचे प्रकार

  • ओक तसर रेशीम
  • तसर रेशीम
  • मूंगा रेशीम
  • एरी या अरंडी रेशीम
  • शहतूती रेशीम
  • गैर शहतूती रेशीम

रेशीम उद्योग मध्ये लागणारे आवश्यक गोष्टी

  1. कापडी जाळी
  2. हायग्रोमीटर हा रेशीम उद्योग मध्ये खूपच महत्वपूर्ण आणि आवश्यक असतो.
  3. रेशीम उद्योगामध्ये कुलर असावा.
  4. ट्रायपॉड असावे

    रेशीम उत्पादनामध्ये अग्रेसर असणारे राज्य कोणते आहे?

    भारत देशामध्ये उत्पादनांमध्ये अग्रेसर असणारे राज्य हे कर्नाटक आहे कर्नाटक राज्यामध्ये रेशीम उत्पादन खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेतले जाते.Reshim Udyog Anudan

अनुदान कोणाकडून मिळते:

शेतकरी बंधूंनो रेशीम उद्योगाला चालना मिळावी,तुती लागवड आणि कीटक संगोपन व्हावं आणि त्यापासून आपल्या भारताची संस्कृती पुढे अशी चालत राहावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने शासनाकडून आपल्याला तीन लाख रुपये अनुदान मिळणार आहे.हे अनुदान आपल्याला तुती लागवड व कीटक संगोपन गृह बांधकाम करण्यासाठी असणार आहे .Reshim Udyog Anudan

यासाठी आपल्याला कमीत कमी 40 गुंठे म्हणजेच एक एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे यामध्ये तीन लाख रुपये पर्यंतचे अनुदान आपल्याला मिळणार आहे.तर यासाठी आपल्याला ऑफलाइन स्वरूपात अर्ज करणे आवश्यक आहे किंवा हा फॉर्म चा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा अर्ज कसा करायचा हे आपण पाहूया.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. ज्या जातीमधील असेल त्या जातीचा दाखला
  4. दारिद्र्यरेषेखालील कुटुंब असेल तर दारिद्र्यरेषेखालील दाखला
  5. या योजनेमध्ये महिला कुटुंबांना प्राधान्य राहील
  6. शारीरिक अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
  7. इंदिरा आवास योजनेचे जर लाभार्थी असाल तर त्याचे प्रमाणपत्र
  8. अल्पभूधारक असाल तर त्याचे प्रमाणपत्र
  9. सातबारा आठ उतारा
  10. किंवा ग्रामपंचायत नमुना नंबर 9 चा उतारा
  11. ज्या शेतकऱ्यांना शेतजमीन नसेल अशा शेतकऱ्यांसाठी आठचा उतारा
  12. रहिवासी दाखला
  13. कुटुंबामधील 18 वर्षापेक्षा अधिक असणाऱ्या लोकांची संख्या
  14. कुटुंबातील सर्वांचा जॉब कार्ड
  15. मोबाईल क्रमांक इत्यादी आवश्यक कागदपत्र आहेत.Reshim Udyog Anudan

अर्ज कसा करावा?

  • मित्रांनो सदर योजना ही ऑफलाइन स्वरूपामध्ये असणार आहे
  • यासाठी आपल्याला ऑफलाईन अर्ज करणे आवश्यक आहे
  • अर्ज आपल्याला हवा असल्यास आपण पुढील लिंक वरती क्लिक करून अर्ज मिळू शकतातReshim Udyog Anudan
  • अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

  • हा अर्ज आपल्याला भरण आवश्यक आहे, त्यानंतर आवश्यक असणारे सर्व कागदपत्र याबरोबर जोडायचे आहेत
  • यामध्ये ग्रामपंचायत मासिक मीटिंगचा ठराव तो देखील आपल्या यामध्ये जोडायचा आहे
  • हे सर्व कागदपत्र आपल्याला जिल्हा रेशीम केंद्रामध्ये सादर करायचे आहे
  • जर जिल्हा रेशीम केंद्राबद्दल माहिती नसेल तर आपल्याला तालुका रेशीम केंद्रामध्ये याची कागदपत्र सादर करायचे आहेत .तालुका रेशीम केंद्र हे आपल्या पंचायत समिती कार्यालयामध्ये उपलब्ध आहे .आपण त्या कार्यालयात सादर करू शकता त्या व्यतिरिक्त आपण आपली कागदपत्र महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना या कक्षामध्ये देखील सादर करू शकताReshim Udyog Anudan
  • आपली कागदपत्र सादर केल्याच्या नंतर शासकीय नियमाप्रमाणे सर्व गोष्टींची पडताळणी केली जाते. आपण खरोखरच व्यवसाय करत आहात किंवा नाही याबद्दलची माहिती घेतली जाते त्यानंतर आपल्याला शासनाकडून आपण सादर केलेल्या प्रस्तावावरती मान्यता येते मान्यता आल्याच्या नंतर पंचायत समिती अधिकारी किंवा रेशीम जिल्हा कक्ष यांच्याकडून आपल्याला संपूर्ण मार्गदर्शक सूची व मार्गदर्शन हे केले जातं
  • त्यानंतर आपल्याला रेशीम व्यवसाय शासन संदर्भात ट्रेनिंग देऊन आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी सांगितलं जातं आणि त्यानुसार आपल्याला एक दोन, तीन, चार, पाच  अशा टप्प्याच्या  स्वरूपामध्ये आपल्याला जे अनुदान आहे ते मस्टर काढून आपल्याला दिले जातात
  •  हे पैसे  मजुरांच्या खात्यावरती जमा होतात म्हणजेच आपले जे कामगार असतील काम करणारे त्यांच्या खात्यावरती सदर पैसे जमा होतात.
  • त्यासाठी आपल्याकडे आपल्या स्वतःबरोबर इतर शेतकऱ्यांची किंवा कुटुंबातील लोकांचे जॉब कार्ड आपल्या जवळ असणे आवश्यक आहे
  • त्यानंतर आपल्याला यामध्ये जवळपास तीन लाख रुपयापर्यंत अनुदान हे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत आपल्याला मिळत असते
  • तर अशा प्रकारे आपल्याला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे . लाभ घेण्यासाठी आपल्याला जिल्हा रेशीम केंद्र यांच्याशी संपर्क साधायचा आहे किंवा आपण जवळील पंचायत समिती ऑफिस शी संपर्क साधू शकता किंवा आपल्याला जर या योजनेच्या संदर्भात काही अडचणी असतील तर आपण आम्हाला कमेंट स्वरूपामध्ये विचारू शकता.Reshim Udyog Anudan
  • कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. 0231-2666682 व reshimkolhapur@gmail.com
  • पुणे ऑफिस:+912025810884,+912026693336,+912025813110,+912025819946
  • रेशीम संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नागपूर
    प्रशासकीय इमारत क्र.२, ६ वा माळा, बी विंग,
    सिव्हिल लाईन, नागपूर
    फोन नंबर ०७१२-२५७९९२०, २१, २४, २६, २७, २८
    ईमेल – dos.maha@gmail.com
    Website – www.mahasilk.maharashtra.gov.in

 

  • असा देखील अर्ज करू शकता:

  • सर्व प्रथम रेशीम संचालनालयाची  www.mahasilk.maharashtra.gov.in या वेबसाईट वर साईन अप मध्ये New user वर क्लिक करून I Agree  केल्यानंतर Stake Holder मध्ये – Farmer – Mulberry/Tasar  वर क्लीक करावे. त्यानंतर शेतकऱ्यांनी सर्व माहिती भरून शेवटी स्वतः चा पासपोर्ट साईजचा फोटो,आधार कार्ड व बँक पास बुक ची फोटो कॉपी Upload करावी. शेवटी Submit केल्यानंतर शेतकऱ्याचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन झाल्याचे कॉम्पुटर च्या screen वर sms येईल. ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर संबंधित जिल्हा रेशीम कार्यालयास जाऊन ७/१२, ८ अ, बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, जॉब कार्ड इ. नोंदणी शुल्कासह देऊन नोंदणीचे काम पूर्ण करावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top