ज्येष्ठ नागरिक बचत योजना
मोदी सरकारने फक्त छोट्या बचत योजनेवरच व्याजदर वाढवले आहे, परंतु आता या ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या व्याज दरात ही मोठी वाढ आहे.
व्याजदर वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू झाले आहे. आता या योजनेवर 8.2% व्याज मिळत आहे आणि या योजनेचा परिपक्वता कालावधी 5 वर्षाचा आहे. तुम्ही जर यात पैसे जमा केले तर ते 5 वर्षापर्यंत काढू शकत नाही.
ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे म्हणजेच ठेवीची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. आता तुम्ही या योजनेमध्ये दुप्पट पैसे त्यात गुंतवू शकता या योजनेसाठी आतापर्यंत जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवण्याची संधी होती परंतु आता 30 लाख रुपये करण्यात आलेली आहे.