Shabari Gharkul Yojana : शबरी घरकुल योजना अर्ज चालू :मागले त्याला घरकुल : असा करा अर्ज

shabari avas yojana

Shabari Gharkul Yojana:मित्रांनो शबरी आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घर मिळणार आहेत, यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर  निधी उपलब्ध केलेला आहे. आपण जर अनुसूचित जमातीमधील असाल तर यामध्ये आपल्याला घरकुल योजना आणि या योजनेचा लाभ आपल्याला अवश्य मिळणार आहे. तर ही योजना काय आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने लाभ घ्यायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे जर आपल्याला घरकुल बांधायचं असेल तर आपण यामध्ये अवश्य बांधू शकता.Shabari Gharkul Yojana

Shabari Gharkul Yojana:

शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना Shabari Gharkul Yojana लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभाग यांच्याकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे व पुढील 22 23 या आर्थिक वर्षाकरिता त्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत सूचना देण्यात आलेले आहेत.

 

कोणाला लाभ मिळणार:

Shabari Gharkul Yojana अंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, जे अनुसूचीत जमातीचे लोक मातीच्या घरामध्ये किंवा झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या घरांमध्ये राहतात अशा अनुसूचित जमाती मधील लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी शबरी आदिवासी घरकुल योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लोकांना त्यांच्या लोकसंख्येचे प्रमाण व गरजू लाभार्थी किती आहेत त्याची पडताळणी करण्यसाठी शासनाकडून ग्रामविकास विभाग व आदिवासी विभाग अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना सूचना दिलेल्या आहेत.त्यानुसार लाभार्थ्यांना घरकुल योजना लाभ देण्यात येणार आहे.

घरकुल योजना लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न अट काय आहे?

सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011 च्या यादी मधील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ दिला गेला आहे तरी या  Shabari Gharkul Yojana योजनेअंतर्गत ज्या ग्रामीण भागातील ज्या अनुसूचित जमातीच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजाराच्या आत मध्ये आहे, अशा अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

कोणाला प्राधान्य आहे?

  • या योजनेमध्ये आदिम जमातीच्या व पारधी जमातीच्या लाभार्थ्यांना देखील यामध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • याचबरोबर  या  Shabari Gharkul Yojana पात्र होण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांना देखील यामध्ये पाच टक्के आरक्षण हे राखीव ठेवण्यात आलेला आहे.
  • याव्यतिरिक्त महिलांना देखील यामध्ये प्राधान्य असणार आहे

 

निवड प्रक्रिया कशी होणार?

लाभार्थी निवड करताना लाभार्थ्यांची प्रत्यक्ष तपासणी करून पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे याव्यतिरिक्त घरकुल वाटप करताना  शासन निर्णयातील तरतुदीचे व याबाबत शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या शासन नियमाचे व  कार्यपद्धतीचे वेळोवेळी पालन करून घरकुल योजना लाभ दिला जाणार आहे.

कोणत्या जिल्ह्यास किती निधी मिळणार?

राज्य सरकार कडून महाराष्ट्रातील सर्व लाभार्थ्यांना घरकुल देण्यासाठी निधी उपलब्ध केला आहे.म्हणजेच मागेल त्याला घरकुल दिले जाणार आहे.

शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा निहाय देण्यात आलेल्या उद्दिष्टांमध्ये जिल्ह्यामधील तालुक्यामधील घरकुले वितरत करताना त्या जिल्ह्यातील एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थी उपलब्ध नसेल तर त्या तालुक्याची उद्दिष्ट त्या जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किंवा शासन नियमाच्या अधीन राहून यामध्ये बदल केला जाऊ शकतो.

शासन निर्णय पहा

शासकीय योजना whats App ग्रुप  जॉईन व्हा

संजय गांधी निराधार योजनेतून मिळणार गरिबांना १८००० रुपये

योजनेचा मुख्य हेतू:

या Shabari Gharkul Yojana शासनाचा मुख्य हेतू असा आहे जास्तीत जास्त गरजूंना या घरकुल योजनेचा लाभ मिळावा,यासाठी राज्य शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न शासनाकडून आहे व यामध्ये जास्तीत जास्त दर्जेदार काम कशा पद्धतीने होईल याबरोबरची जी काळजी आहे ती घेतली जाणार आहे. यामध्ये घरकुल कामाचा प्रगती अहवाल गोळा केला जाणार आहे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. ग्रामपंचायत ८ अ  उतारा
  4. जातीचा दाखला
  5. फोटो
  6. मोबाईल क्रमांक
  7. विहित नमुन्यातील अर्ज
  8. जॉब कार्ड
  9. ग्रामपंचायत रहिवासी दाखला
  10. यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचा दाखला
  11. मासिक सभेचा ठराव

 

अर्ज कसा करावा:

  • सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी आपल्याला Shabari Gharkul Yojana  विहित नमुन्यातील अर्ज व  वर नमूद केलेले सर्व कागदपत्रे एकत्र गोळा करायचे आहेत
  • हा सर्व फॉर्म ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनाखाली भरायचा आहे
  • त्या फॉर्म वरती ग्रामसेवक यांचा सही शिक्का घ्यायचा आहे
  • त्यानंतर हा सर्व फॉर्म आपल्याला ग्रामपंचायत मार्फत किंवा स्वतः पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी सादर करायचा आहे
  • त्यानंतर आपल्या अर्जाला मंजुरी दिली जाते आणि मग आपण घरकुल योजना ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती यांच्याकडून सांगितल्यानंतर घरकुल बांधण्याची प्रक्रिया सुरू करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये लाभ घ्यायचा आहे

घरकुल योजनेसाठी अनुदान किती मिळेल?

शबरी आवास योजना या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती किंवा पारधी समाजातील लोकांसाठी घरकुल योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या वतीने केलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला सरासरी  135000 पासून ते एक लाख 70 हजार रुपयापर्यंत घरकुल बांधण्यासाठी शासनाकडून आपल्याला अनुदान दिले जाते

निष्कर्ष:

आजच्या लेखामध्ये आपण Shabari Gharkul Yojana बद्दल माहिती पहिली आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हास कमेंट मध्ये नक्की कळवा.अधिक माहितीसाठी आमच्या whats app ग्रुप ला जॉईन होऊ शकता.

धन्यवाद

 

 

 

 

1 thought on “Shabari Gharkul Yojana : शबरी घरकुल योजना अर्ज चालू :मागले त्याला घरकुल : असा करा अर्ज”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top