Star 𝙺𝚒𝚜𝚊n 𝙶𝚑𝚊𝚛 yojana

Star 𝙺𝚒𝚜𝚊n 𝙶𝚑𝚊𝚛 yojana :

शेतकरी बंधूंनो आपल्याला माहित आहे. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. परंतु या कृषी प्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही हालकीची आहे; त्यामुळे त्यांना आपले स्वतःचे स्वप्नाचे घर बांधणेे किंवा दुरुस्त करणे देखील शक्य होत नाही. हीच बाब लक्षात घेऊन बँक ऑफ इंडिया या बँकेने “स्टार किसान घर योजना” सुरू केली आहे. या योजनेत बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी व घर दुरुस्त करण्यासाठी कमी व्याज  दरात 1 लाख ते 50 ते लाख पर्यंत गृह कर्ज दिले जाणार व कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देखील देण्यात येणार आहे.

 

𝙷𝚘𝚖𝚎 𝚕𝚘𝚊𝚗 :

गृह कर्जावर व्याज किती? व परतफेड करण्यासाठी ची मुदत किती याविषयी पाहूयात.

 

शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये घर अथवा फार्महाउस बांधायचे आहे, किंवा सध्या असलेल्या घराची दुरुस्ती करायची असल्यास त्यांना या गृह कर्जाचा लाभ मिळेल. नवीन घर बांधण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना 8.05% व्याजदराने 1 लाख ते 50 लाख पर्यंत कर्ज मिळू तसेच. तसेच कर्ज फेडण्यासाठी  15 वर्षापर्यंत मुद्दत दिली जाणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ :

 

• ज्या शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ इंडिया मध्ये आहे, अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

• बँक ऑफ इंडिया मध्ये  kcc  खाते असलेले कृषी कार्यात गुंतलेले शेतकरी, त्यांना या योजनेअंतर्गत या कर्जाचा लाभ मिळू शकतो.

• शेतकरी बंधूंनो या योजनेअंतर्गत (IT Return)  देण्याचे देखील आवश्यकता नाही.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर गृह कर्ज घ्यायचे असेल तर आपण जवळील बँक ऑफ इंडिया या शाखेत जाऊन  “𝚂𝚝𝚊𝚛 𝚔𝚒𝚜𝚊𝚗 𝙶𝚑𝚊𝚛 𝚢𝚘𝚓𝚊na” याविषयी अधिक माहिती घेऊ शकता.

शेतकरी बंधूंनो आपल्याला जर ही योजना उपयुक्त वाटली असेल; तर जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद!

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top