टेलर ट्रॉली खरेदी करण्यासाठी मिळणार १०० % अनुदान: Tractor Telar Anudan

tractor telar anudan

Tractor Telar Anudan: मित्रांनो आपल्याला जर ट्रॅक्टर ट्रॉली जर खरेदी करायची असेल तर,डम्पिंग खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे. तरी हे अनुदान कशा पद्धतीने मिळवायचं यासाठी फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, याबद्दलची माहिती आपण आजच्या या लेखांमध्ये पाहणार आहोत,Tractor Telar Anudan

तर मित्रांनो हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे जर आपल्याला डम्पिंग ट्रॉली तर खरेदी करायची असेल, डम्पिंग टेलर खरेदी करायचा असेल तर शासनाकडून अनुदान मिळणार आहे. चला तर हा लेख आपण सुरू करूया.

Tractor Telar Anudan:

मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंसाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर टेलर साठी अनुदान वितरित करण्यात येत आहे. यासाठी आपल्याला ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे या फॉर्म बद्दल आपण माहिती पाहूया.

योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. आधार कार्ड
  2. बँकेचे पासबुक
  3. सात बारा किंवा आठ उतारा
  4. ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांकTractor Telar Anudan

 

अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी पात्रता:

  • ज्या शेतकऱ्याला ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी अर्ज करायचा असेल अशा शेतकऱ्यांच्या नावे कमीत कमी 11 गुंठे  जमीन असणे आवश्यक आहे. असा शेतकरी याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो.
  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना प्राधान्य राहील.
  • अपंग व्यक्ती असेल तरच त्यांना प्राधान्य राहील.Tractor Telar Anudan

पॉवर टिलर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज केल्यावर लाभ कधी मिळेल:

मित्रांनो अर्ज केल्याच्या नंतर या योजनेमध्ये आपण पाच वर्षांमध्ये केव्हाही पात्र होऊ शकतात.
एकदा यामध्ये आपण जर फॉर्म भरला तर पुन्हा डबल फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीआपला फॉर्म ५ वर्ष ग्राह्य धरला जाईल.Tractor Telar Anudan

 

योजनेसाठी किती अनुदान मिळणार आहे

या योजनेमध्ये पात्र झाल्यानंतर आपल्याला सरासरी ९०००० ते१५००००  रुपये पर्यंत अनुदान मिळणार आहे.

फॉर्म कसा भरावा

  1. सर्वप्रथम महाडीबीटी या वेबसाईट वरती जावे
  2. https://mahadbtmahait.gov.in/
  3. वेबसाईट वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला शेतकरी योजना या बटणावरती आपल्याला क्लिक करायचा आहे
  4. त्यानंतर आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड विचारल
  5. उजव्या बाजूला आपल्याला नवीन अर्ज नोंदणी या बटणावर क्लिक करायचं आहे
  6. त्यानंतर यामध्ये आपलं संपूर्ण नाव आपला युजर आयडी पासवर्ड ईमेल आयडी मोबाईल क्रमांक कॅपच्या टाकून आपल्याला नोंदणी करायचे आहे
  7. नोंदणी केल्यानंतर आपण जो यूजर आयडी पासवर्ड तयार केला होता तो पुन्हा आपल्याला मुख्यपृष्ठावरती येऊन अर्जदार लॉगिन करायचा आहे
  8. त्या ठिकाणी आपला यूजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर आपण वेबसाईट च्या पुढील पानावरती प्रवेश कराल
  9. लॉगिन केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला आपली प्रोफाईल शंभर टक्के भरून घेणे आवश्यक आहे
  10. त्या प्रोफाईल मध्ये आपलं संपूर्ण नाव आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आहात अपंग आहात का नाही बँकेची डिटेल भरावी लागेल
  11. त्यानंतर आपल्या संपूर्ण पत्ता आपल्याला भरावा लागेल
  12. त्यानंतर आपल्या जमिनीचा तपशील भरावा लागेल
  13. जमिनीचा तपशील भरत असताना जर सामायिक क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र भरावे लागेल जर स्वतंत्र असेल तर स्वतंत्र क्षेत्र म्हणजेच वैयक्तिक क्षेत्र भरावा लागेल
  14. फॉर्म भरत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवून आवश्यक आहे एक म्हणजे सातबारा उताऱ्याचा तपशील आणि दुसरा म्हणजे आठ खाते तपशील.
  15. सातबारा उतारा तपशील मध्ये गट क्रमांक हा सातबारा वरील टाकावा व आठ खाते तपशील मध्ये आपल्याला आठ वरील खाते क्रमांकटाकणे आवश्यक आहे.जमिनीची तपशील माहिती भरत असताना आपले जेवढे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्र टाकणं आवश्यक आहे
  16. जमिनीचा तपशील टाकत असताना जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपला युट्युब मध्ये व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता त्याची लिंक मी लेखाच्या शेवटी आपल्यापर्यंत सादर करेल त्या पद्धतीने आपल्याला टाकणं आवश्यक आहे अन्यथा भविष्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते
  17. आता पुढे जाऊयाTractor Telar Anudan
  18. 100% प्रोफाइल भरल्याच्या नंतर आपल्याला अर्ज करा या बाबी वरती जायचं आहे
  19. त्यानंतर आपल्यासमोर चार पर्याय दिसतील
  20. कृषी यांत्रिकीकरण
  21. सिंचन साधने
  22. बियाणे व औषध खते
  23. फलोत्पादन
  24. यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण यावरती क्लिक करायचा आहे
  25. कृषी यांत्रिकीकरण मध्ये मुख्य घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करायचा आहे
  26. तपशील मध्ये ट्रॅक्टर पावरचलित अवजारे यावरती क्लिक करायचा आहे
  27. एचपी श्रेणी  यामध्ये 25 एचपी पेक्षा जास्त ते 35 एचपी पर्यंत हा पर्याय निवडायचा आहे
  28. यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये आपल्याला वाहतूक साधने हा पर्याय निवडायचा आहे
  29. मशीनचा प्रकार यामध्ये आपण  टेलर ट्रॉली क्षमता तीन टना पर्यंत, टेलर ट्रॉली क्षमता ५ टन म्हणजे आपला जो डंपिंग आहे तो तीन टन आणि पाच टन असा ऑप्शन असणार जो आपल्याला हवा आहे तो निवडायचा आहे
  30. आपल्याला तीन टन जर निवडायचा असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे
  31. त्यानंतर जतन बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला मुख्यपृष्ठावरती येऊन अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे
  32. त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करताना 23 रुपये ते 3३पैसे एवढे पेमेंट करणे आवश्यक आहे
  33.  पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला अर्जाचे पोहोच आपल्याजवळ जमा होईल
  34. ती पोहोच पावती आपल्याला आपल्याकडे जपून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहेTractor Telar Anudan

कुटी मशीनसाठी मिळणार १००% लाभ-अर्ज करा

अर्ज केल्याच्या नंतर निवड कधी होईल:

अर्ज केल्याच्या नंतर आपली निवड प्रक्रिया ही पाच वर्षांमध्ये कधीही एकदा होऊ शकते एकदा फॉर्म भरला तर पुन्हा पाच वर्षे फॉर्म भरण्याची आवश्यकता नाहीTractor Telar Anudan

निवड झाल्यावर कशी कळेल

शेतकरी बंधूंनो आपण या योजनेमध्ये जर पात्र झालात किंवा निवड झाली तर आपल्या मोबाईल वरती एसएमएस द्वारे कळवलं जातं.त्यानंतर जर आपल्याला एसएमएस आला नाही तर तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून आपल्याला कॉल वरती संपर्क केला जातो आणि तरी देखील आपल्याला संपर्क झाला नाही तालुका कृषी अधिकारी हे आपल्यापर्यंत आपल्या घरापर्यंत संपर्क करून आपली निवड झालेली आहे अशा पद्धतीची सूचना देतात. त्यानंतर आपल्याला कागदपत्र अपलोड करायचे असतात तर अशा प्रकारे आपल्याला तालुका कृषी अधिकारी संपर्क करत असतातTractor Telar Anudan

अशाप्रकारे शेतकरी बंधुनो आपल्याला डम्पिंग योजनेसाठी अर्ज करायचा आहे . या योजनेमध्ये किंवा फॉर्म भरत असताना जर आपल्याला काय समस्या असतील तर आपण आम्हाला कमेंट्स मध्ये अवश्य विचारू शकता आणि या व्यतिरिक्त आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला आणि youtube चॅनलशी देखील संपर्क साधू शकता यामध्ये कशा पद्धतीने फॉर्म भरायचे याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली असते

निष्कर्ष:

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये Tractor Telar Anudan आपण याबद्दलची माहिती घेतली. तर आपल्याला हा Tractor Telar Anudan  लेख कसा वाटला. हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तसेच आपल्याला जर अन्य कोणत्याही शासकीय योजनांची माहिती हवी असेल ते देखील कमेंट करून कळवा. धन्यवाद

 

हे देखील वाचा:

आपण जर pan card club मध्ये पैसे गुताविले असतील तर ते पुन्हा मिळविण्यासाठी आपण पुढील माहिती पाहू शकता.

आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. 

                 व्हॉटसप ग्रुप 

आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. 

              Telegram Group 

सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्‍या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. 

                Youtube Channel

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top