tractor trolly yojana maharashtra 2023

Tractor Trolley Yojana:

फॉर्म कसा भरावा:

  1. सर्वप्रथम महाडीबीटी या वेबसाईट वरती जावे
  2. https://mahadbtmahait.gov.in/
  3. वेबसाईट वरती गेल्यानंतर उजव्या बाजूला शेतकरी योजना या बटणावरती आपल्याला क्लिक करायचा आहे
  4. त्यानंतर आपल्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड विचारल
  5. उजव्या बाजूला आपल्याला नवीन अर्ज नोंदणी या बटणावर क्लिक करायचं आहे
  6. त्यानंतर यामध्ये आपलं संपूर्ण नाव आपला युजर आयडी पासवर्ड ईमेल आयडी मोबाईल क्रमांक कॅपच्या टाकून आपल्याला नोंदणी करायचे आहे
  7. नोंदणी केल्यानंतर आपण जो यूजर आयडी पासवर्ड तयार केला होता तो पुन्हा आपल्याला मुख्यपृष्ठावरती येऊन अर्जदार लॉगिन करायचा आहे
  8. त्या ठिकाणी आपला यूजर आयडी पासवर्ड टाकल्यानंतर आपण वेबसाईट च्या पुढील पानावरती प्रवेश कराल
  9. लॉगिन केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला आपली प्रोफाईल शंभर टक्के भरून घेणे आवश्यक आहे
  10. त्या प्रोफाईल मध्ये आपलं संपूर्ण नाव आपण कोणत्या प्रवर्गामध्ये आहात अपंग आहात का नाही बँकेची डिटेल भरावी लागेल
  11. त्यानंतर आपल्या संपूर्ण पत्ता आपल्याला भरावा लागेल
  12. त्यानंतर आपल्या जमिनीचा तपशील भरावा लागेल
  13. जमिनीचा तपशील भरत असताना जर सामायिक क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र भरावे लागेल जर स्वतंत्र असेल तर स्वतंत्र क्षेत्र म्हणजेच वैयक्तिक क्षेत्र भरावा लागेल
  14. फॉर्म भरत असताना दोन गोष्टी लक्षात ठेवून आवश्यक आहे एक म्हणजे सातबारा उताऱ्याचा तपशील आणि दुसरा म्हणजे आठ खाते तपशील.
  15. सातबारा उतारा तपशील मध्ये गट क्रमांक हा सातबारा वरील टाकावा व आठ खाते तपशील मध्ये आपल्याला आठ वरील खाते क्रमांकटाकणे आवश्यक आहे.जमिनीची तपशील माहिती भरत असताना आपले जेवढे क्षेत्र आहे तेवढे क्षेत्र टाकणं आवश्यक आहे
  16. जमिनीचा तपशील टाकत असताना जर आपल्याला काय अडचणी असतील तर आपला युट्युब मध्ये व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता त्याची लिंक मी लेखाच्या शेवटी आपल्यापर्यंत सादर करेल त्या पद्धतीने आपल्याला टाकणं आवश्यक आहे अन्यथा भविष्यामध्ये आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते
  17. आता पुढे जाऊयाTractor Telar Anudan
  18. 100% प्रोफाइल भरल्याच्या नंतर आपल्याला अर्ज करा या बाबी वरती जायचं आहे
  19. त्यानंतर आपल्यासमोर चार पर्याय दिसतील
  20. कृषी यांत्रिकीकरण
  21. सिंचन साधने
  22. बियाणे व औषध खते
  23. फलोत्पादन
  24. यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकीकरण यावरती क्लिक करायचा आहे
  25. कृषी यांत्रिकीकरण मध्ये मुख्य घटक कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्यावरती क्लिक करायचा आहे
  26. तपशील मध्ये ट्रॅक्टर पावरचलित अवजारे यावरती क्लिक करायचा आहे
  27. एचपी श्रेणी  यामध्ये 25 एचपी पेक्षा जास्त ते 35 एचपी पर्यंत हा पर्याय निवडायचा आहे
  28. यंत्रसामग्री अवजारे उपकरणे यामध्ये आपल्याला वाहतूक साधने हा पर्याय निवडायचा आहे
  29. मशीनचा प्रकार यामध्ये आपण  टेलर ट्रॉली क्षमता तीन टना पर्यंत, टेलर ट्रॉली क्षमता ५ टन म्हणजे आपला जो डंपिंग आहे तो तीन टन आणि पाच टन असा ऑप्शन असणार जो आपल्याला हवा आहे तो निवडायचा आहे
  30. आपल्याला तीन टन जर निवडायचा असेल तर त्यावर क्लिक करायचं आहे
  31. त्यानंतर जतन बटणावरती क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला मुख्यपृष्ठावरती येऊन अर्ज सादर करा वरती क्लिक करायचा आहे
  32. त्यानंतर आपल्याला अर्ज सादर करताना 23 रुपये ते 3३पैसे एवढे पेमेंट करणे आवश्यक आहे
  33.  पेमेंट केल्याच्या नंतर आपल्याला अर्जाचे पोहोच आपल्याजवळ जमा होईल
  34. ती पोहोच पावती आपल्याला आपल्याकडे जपून ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला अर्ज करायचा आहेTractor trolly yojana maharashtra
error: Content is protected !!
Scroll to Top
Scroll to Top