असा अपडेट करा आधार कार्ड वरील पत्ता सोप्या पद्धतीने :
Steps to Update Address on Aadhar card :
• आपल्या आधार कार्ड वरील माहिती मध्ये सुधारणा करण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/ या लिंक वर क्लिक करून अधिकृत संकेतस्थळावर जा.
• होमपेजवरील my addhaar या पर्याया वर क्लिक करावे.
• आता त्यामधील अपडेट युवर आधार या सेक्शन वर क्लिक करून आता आपल्यासमोर आलेल्या login या शब्दावर क्लिक करावे.
यानंतर आपल्यासमोर आलेल्या पेज वर आपला मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी टाकून लॉगिन वर क्लिक करावे.
Update on aadhar card :
• आता ऑनलाईन अपडेट सर्विस वर क्लिक करून अपडेट आधार ऑनलाईन हा पर्याय निवडा.
• आता आलेल्या सूचना पूर्ण वाचून घ्या व address हा पर्याय निवडून त्यावर क्लिक करा.
• आता आपल्यासमोर जुना पत्ता येईल तो वाचून घेऊन त्याखालील पत्ता बदलण्यासाठी रकाने येथील त्यात आपला योग्य तो नवीन पत्ता टाका.
• यानंतर तुमच्या पत्त्याचा पुरावा म्हणून आवश्यक ते कागदपत्रेे अपलोड करा.
• आवश्यक ते बदल करून नवीन पत्त्याचे खात्री झाल्यानंतर सबमिट द रिक्वेस्ट वर क्लिक करून आपल्यासमोर बदलासाठीचे शुल्क 50 रुपये भरण्यासाठी पेमेंट पोर्टल येईल ते UPI नेट बँकिंग किंवा इतर पर्यायांचा वापर करून 50 रुपये शुल्कांचा ऑनलाईन भरणा करा.
अशाप्रकारे आपण आपल्या आधार कार्ड मधील पत्ता बदलू शकतो व याबरोबर इतर काही नाव, जन्मतारीख इत्यादी आपण बदल ऑनलाईन पद्धतीने करू शकता. धन्यवाद!