Warkari vima yojana 2023: राज्य शासनाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदायांना विमा कवच मिळणार आहे तर हे विमा कवच मोफत असणार आहे नक्की ही योजना काय आहे वारकरी संप्रदायांना विमा कशा पद्धतीने मिळणार आहे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
Warkari vima yojana 2023:
मुख्यमंत्री महोदय शिंदे यांनी काल घोषणा केलेली आहे ज्याच्यामध्ये वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान जर अपघाती मृत्यू झाला तर त्यांना पाच लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. याव्यतिरिक्त जर त्यांना कायमचं अपंगत्व आलं तर एक लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. अशा प्रकारची घोषणा मुख्यमंत्री महोदय यांनी केलेली आहे व लवकरच याची अंमलबवून बजावणी संपूर्ण राज्यांमध्ये केले जाणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिलेली आहे. त्यामुळे जर एखाद्या वारकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आलं तर त्यांना आर्थिक मदत शासनाकडून मिळणार आहे अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
लवकरच याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल आणि याची अंमलबजावणी केली जाईल यासाठी वारकरी हा रजिस्टर दिंडीमध्ये नोंदणी करत असणे आवश्यक आहे.