पुणे जिल्हा परिषद योजना चालू २०२२-Zilla Parishad Yojana 2022:
पुणे जिल्हा परिषदेविषयी
- स्व. यशवंतराव चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली मे १९६२ मध्ये पुणे जिल्हा परिषदेची स्थापना झाली.त्यापूर्वी लोकल बोर्ड असे सभोधले जायचे त्यावेळी लोकल बोर्ड चे अध्यक्ष दौंड येथील कै.सर्जेराव गुंड हे होते
- स्व. शंकरराव दशरथराव उरसळ यांना पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होण्याचा पहिला मान मिळाला. त्यांनी दि १२/८/१९६२ ते ११/८/१९७२ पर्यत अध्यक्ष पद भूषविले. तेव्हापासून आज अखेर 22 अध्यक्ष झाले.
- आज रोजी १३ पंचायत समित्या व १४०७ ग्राम पंचायती ग्रामीण भागाच्या विकासासाठी कार्यरत आहेत. शासनाच्या कोणत्याही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात पुणे जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिलेली आहे.
- सन 2012 साली पुणे जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001-2008 प्रमाणित झालेली आहे.
- यशवंत पंचायत राज अभियान सन २०११-२०१२ जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यामध्ये पुणे जिल्हा परिषद व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे व पंचायत समिती स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये पंचायत समिती बारामती व्दितीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे. आणि ग्रामपंचायत कांदली ता.जुन्नर गामपंचायत स्तरावरील महाराष्ट्र राज्यमध्ये तृतीय क्रमांक मानकरी ठरलेली आहे.Zilla Parishad Yojana 2022
Zilla Parishad Yojana 2022:
पुणे जिल्हा परिषद पुणे, कृषी विभाग जिल्हा परिषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येत आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना शासनाने पाच डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतर म्हणजेच डीबीटी या पद्धतीने राबविण्यात येणार आहेत. कृषी विभागाच्या विषय समितीचे समितीने निश्चित केलेल्या अटी आणि नियमानुसार पात्र असणाऱ्या व अंतिम मान्यता दिलेल्या पात्र व गरजू लाभार्थ्यांना विहित बाबींचा लाभ देण्यात येत आहे. सदर योजना विषयी खालील माहिती देण्यात आली आहे याबाबत सविस्तर माहिती जिल्हा परिषद वेबसाईट, पंचायत समिती व ग्रामपंचायत या ठिकाणी उपलब्ध आहे. विहित निकषाप्रमाणे पात्र लाभार्थ्याकडून खालील योजनांसाठी विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने मागून घेत आहेत. विविध अर्ज व कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कार्यालयात मुदतीत जमा करायचे आहेत.Zilla Parishad Yojana 2022
जिल्हा परिषद पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या एकूण योजना:
कृषी विभाग:
- तीन एचपी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच
- पाच एचपी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच
- साडेसात एचपी ओपनवेल विद्युत मोटर पंप संच
- कडबाकुटी यंत्र २ एच पी
- पाच एचपी डिझेल इंजिन पंप
- कॅरेट प्लास्टिक
- प्लास्टिक ताडपत्री
- २.५ इंच पी व्ही सी पाईप
- ३ इंच पी व्ही सी पाईप
- २.५ इंच hdpe पाईप
- सरी रिझर
- औषधाचा पंप
- सोलर वॉटर हीटर 200 लिटर .
- शारदा माता भगिनी अर्थ् सहाय्य योजना(पुणे जिल्ह्यात वास्तव्य व शेतजमीन असणाऱ्या विधवा शेतकरी महिला घटस्फोटीत महिला परित्य शेतकरी महिला निराधार शेतकरी महिला)
- गाई खरेदी साठी अनुदान योजना Zilla Parishad Yojana 2022
योजनेत पात्र होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- संबंधित शेतकऱ्याने विहित नमुन्यात अर्ज करावा
- सातबारा व आठ अ उतारा
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँकपासबुक
- मतदानओळखपत्र
- जातीचा दाखला
- फोटोZilla Parishad Yojana 2022
योजनेसाठी अटी व निकष:
-
- लाभार्त्यास सदर योजनेसाठी ७५ % अनुदान असेल
- लाभार्थ्यांची धारण शेती/क्षेत्र जास्तीत जास्त दहा एकरापर्यंत असावे
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य राहील
- आठ किंवा तलाठी यांचा दाखला लागेल.
- योजना अंतर्गत लाभार्थ्यांना जास्तीत जास्त एक अवजारासाठी लाभ देण्यात येईल.
- सदर योजनेअंतर्गत पीव्हीसी व hdpe पाईपला प्रति लाभार्थ्यात जास्तीत जास्त वीस पाईप किंवा 120 मीटर पर्यंत लाभ राहील
- प्लास्टिक कॅरेट्स बाबतीत प्रती लाभार्थ्यात जास्तीत जास्त 30 नागाचा लाभ देण्यात येईल.
- विद्युत मोटर पंप संच लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी सिंचन सुविधांची नोंद असल्याचा पुरावा देणे आवश्यक आहे .
- लाभार्थ्यांनी कडबा कुट्टी यंत्र बाबीसाठी विजेची सोय असल्याबाबतच वीज बिलाची साक्षांकित प्रत आवश्यक राहील.
- आधार कार्ड जोडणी केलेल्या बँक पासबुकची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
- गाई खरेदीसाठी जास्तीत जास्त ६५ हजार अनुदान देय असेल.
- शारदा माता भगिनी यांना जास्तीत जास्त ५ हजार पर्यंत रक्कम त्यांच्या खात्यात मिळेल.Zilla Parishad Yojana 2022
अर्जदारांसाठी महत्वाची सूचना:
- उपरोक्त सर्व योजनेअंतर्गत देण्यात येणारे साहित्य हे लाभार्थ्याने प्रथम स्वखर्चाने घ्यायचे आहे, परंतु असे साहित्य घेण्यापूर्वी अर्जदाराने केलेल्या अर्जाची पात्रता तपासून प्रथम इओआय दिले जाईल व अशा लाभार्थ्यास विहित केलेल्या मुदतीत खरेदी समितीने निश्चित केलेल्या नियमांच्या आधारे लाभार्थ्याने स्वतः खरेदी करून त्यांचे पुराव्यासह जीएसटी धारक बिल सादर करणे बंधनकारक राहील.
- त्याचप्रमाणे खरेदी केलेल्या साहित्याची गुणवत्ता जिल्हा परिषदेकडून निश्चित केलेले कार्य पद्धतीने तपासणी केली जाईल व साहित्य विहित गुणवत्तेत व साहित्य चांगले आहे असे दिसून आल्यास लाभार्थ्याच्या बँक खात्यात पात्र अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाईल
- .यासाठी सर्व लाभार्थ्यांनी अर्ज सोबत बँक खात्याचा पुरावा दर्शवणारे बँक पासबुक, बँकेचे नाव, पत्ता ,खाते क्रमांक, आयएफसी कोड, हे सादर करावे खाते हे बंधनकारक राहील.
- सदर योजनेचे विहित नेमातील अर्ज आपल्या वेबसाईटवर उपलब्ध आहे (अर्ज पहा)
- उपलब्ध योजनेअंतर्गत एका बाबीसाठी लाभार्थ्यास एकच अर्ज करता येईल
- लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती,ZP यांचेकडे अर्ज सादर करावा
- लाभार्थी निवडण्याचा अंतिम अधिकार कृषी समिती सभेत राहील
- अर्ज सोबत जोडलेली माहिती चुकीची अथवा खोटे आढळल्यास अर्ज रद्द होईल
- अधिक माहितीसाठी नजीकच्या पंचायत समिती/ग्रामपंचायत कार्यालय येथे संपर्क साधावा
- निधी उपलब्ध नुसार लाभार्थी निवड कमी जास्त होऊ शकतेZilla Parishad Yojana 2022
-
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व फॉर्म:
- लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचेकडे दिनांक 22 ऑगस्ट 2022 पर्यंत जमा करायचे आहेत
- फॉर्म पहा
- शारदा शेतकरी माता फॉर्म पहा
- शेती औजारे फॉर्म पहा
- शेंद्रीय शेती फॉर्म पहा
- सोलर फॉर्म पहा
योजनेसाठी कर्ज करण्याची प्रोसेस:
- वरील सर्व योजनांचे अर्ज हे ऑफलाईन असणार आहेत
- अर्ज भरून पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत मार्फत पंचायत समितीमध्ये सादर करावे
- अर्जासोबत वरील सर्व कागदपत्रे जोडावी व त्यानंतर आपली निवड प्रक्रिया होईलZilla Parishad Yojana 2022
- तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला रोजच्या केंद्र, राज्य सरकारच्या नवनवीन योजनांसाठी जर घरबसल्या नवीन आलेल्या योजनांची माहिती, अपडेट मिळवायचे असतिल तर खाली दिलेल्या व्हॉटसप ग्रुपला जॉईन व्हा. व्हॉटसप ग्रुप आणि नवीन सर्व प्रकारची महिती, स्कीम, अपडेट बघण्यासाठी खाली दिलेल्या Telegram ग्रुपला जॉईन करा. Telegram Group सदर योजनेची पूर्ण माहिती हवी असेल किंवा दुसर्या कोणत्याही योजनांची माहिती किंवा फॉर्म भरून पहिजे असतिल तर खालील दिलेल्या YouTube video वरील video बघा. Youtube Channel या योजना देखील बघा :