Mukhymantri shaswat Krushi sinchain Yojana:टिंबक सिंचनसाठी मिळेल 80 टक्केे अनुदान लगेचच लाभ घ्या

Mukhymantri shaswat Krushi sinchain Yojana:

नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आम्ही आपल्यासाठी राज्य शासनाकडील एका महत्त्वाच्या योजनेबद्दल माहिती घेऊन आलो आहोत. ही योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे व या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा देखील होणार आहे. चला तर मग कोणती आहे ही राज्य शासनाची नवीन योजना जेणेकरून शेतकऱ्याला मोठा फायदाा होणार आहे व या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत व यासाठी अर्ज कोठे व कसा करायचा याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत. शेतकरी बंधूंनो हा लेख संपूर्ण वाचा जेणेकरून आपल्याला या योजनेची सविस्तर माहिती मिळेल. चला तर मंग आजच्या या लेखनाला सुरुवात करूया.

Mukhymantri shaswat Krushi sinchain Yojana:-

मित्रांनो आपल्याला माहितीच आहे, की पाणी बिना जीवन नाही पूर्वीपासूनच शेतकरी मित्र शेतामध्ये पाणी देत असताना पारंपरिक पद्धतीचा वापर करत होते. म्हणजे शेतांना पाठाने मोकळे पाणी सोडत होते. अजूनही त्या पद्धतीचा अवलंब बऱ्याच ठिकाणी केला जात आहे. पण त्यामध्ये आता पाणी देण्याचा वेगवेगळ्या पद्धती देखील विकसित झालेले आहेत.

सध्या पाणी देत असताना शेतकरी मित्र टिंबक सिंचन व तुषार सिंचन चा वापर करत आहेत. या पद्धतीचा अवलंब केल्यामुळे गुणवत्ता पूर्ण शेतमाल तयार करण्यास व उपलब्ध पाण्याची शेत पिकला पूर्तता करण्यास शेतकऱ्यांना हातभार लागला आहे. आणि मित्रांनो खरं म्हणजे ठिंबक सिंचन किंवा तुषार सिंचन प्रणालीचा वापर करणे गरजेचे आहे. कारण पूर्वीसारखा पाण्याचा साठा सध्या उपलब्ध नाही.

Mukhymantri shaswat Krushi Sinchan Yojana:

त्यामुळे टिंबक सिंचन (mukhymantri shaswat Krushi Sinchan Yojana) व तुषार सिंचन प्रणालीचा शेतामध्ये वापर करणे आवश्यक आहे. आणि याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे. परंतु या प्रणालीचा वापर करत असताना टिंबक सिंचन तुषार सिंचन शेतामध्ये जोडण्यासाठी खर्च येत असतो. या प्रणालीला लागणाऱ्या पाईप्स, लेटरल, नोझल, स्पिंकलर इत्यादी गोष्टी खर्चिक असतात. यासाठी शेतकऱ्यांकडे आर्थिक भांडवल असणे गरजेचे आहे.

पण मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांकडे या गोष्टीचा अवलंब करण्यासाठी म्हणावे इतके भांडवल उपलब्ध नसते. याकरिता शेतकऱ्यांना शासन आर्थिक सहाय्य करणार आहे. म्हणजेच मित्रांनो टिंबक सिंचन किंवा तुषार सिंचन घेण्यासाठी शासन अनुदान देणार आहे. अनुदानाचा लाभ घेऊन शेतकरी याचा शेतामध्ये ठिंबक सिंचन किंवा तुषार सिंचन जोडू शकतील.

तर अशाप्रकारे शासनाने राबवलेली मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजन ( mukhymantri shaswat Krushi Sinchan Yojana) या योजनेच्या माध्यमातून टिंबक सिंचन किंवा तुषार सिंचन खरेदीवर आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे.

असे मिळेल अनुदान:

बंधूंनो या योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकरी बंधू भगिनींना शासनाकडून 50% अनुदान दिले जात असून बहु भूधारक शेतकरी बंधू भगिनींना 45% अनुदाननुदान दिले जाते. मित्रांनो यामध्ये देखील पूरक अनुदान म्हणून वरील 25% व 30 टक्के अनुदान हे शासनाने या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
Scroll to Top